Join us

Rishabh Pant Accident: रिषभ पंतच नाही तर या ५ क्रिकेटपटूंनाही झाला होता अपघात, जवळून पाहिला होता मृत्यू, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:28 IST

Open in App
1 / 7

भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंत कार अपघातामध्ये जखमी झाला आहे. पंतचा पाय, डोके आणि पाठीला जखमा झाल्या आहेत. सुदैवाने त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

2 / 7

दरम्यान, जागतिक क्रिकेटमधील काही दिग्गज क्रिकेटपटूंनाही यापूर्वी गंभीर अपघात झाले आहेत. त्यात त्यांनी मृत्यूला जवळून पाहिले होते. काही क्रिकेटपटूंचा या अपघातात मृत्यू झाला होता. तर काहींनी गंभीर दुखापतींवर मात करत पुनरागमन केले होते. त्यातील काही क्रिकेटपटू पुढीलप्रमाणे.

3 / 7

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला २०१८ मध्ये देडराडून येथून नवी दिल्ली येथे येत असताना त्याच्या कारला अपघात झाला होता. त्या अपघातावेळी मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यामध्ये वाद सुरू होता. मात्र या अपघातातून सावरत मोहम्मद शमीने क्रिकेटच्या मैदानात जोरदार पुनरागमन केले होते.

4 / 7

भारताचा फलंदाज करुण नायर हा जुलै २०१६ मध्ये एका अपघाताची शिकार झाला होता. तो केरळमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. तिथे तो नातेवाईकांसोबत पम्पा नदी पार करून होडीतून अरनमुला मंदिरात जात होता. मात्र होडी दुर्घटनाग्रस्त झाल्याने करुण नायरला काही काळ पोहून जावं लागलं. दरम्यान, ग्रामस्थांनी त्याला वाचवले.

5 / 7

वेस्ट इंडिजमधील निकोलस पूरन याला जानेवारी २०१५ मध्ये एक भीषण अपघात झाला होता. त्यानंतर पूरनला चालताही येत नव्हते. पूरनच्या दोन्ही पायांवर सर्जरी झाली होती. काही महिने तो व्हिलचेअरवर होता. मात्र पूरनने जिद्दीने पुनरागमन केले होते.

6 / 7

फेब्रुवारी २०२० मध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस याला जमैकामध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातात थॉमसची कार पूर्णपणे उलटली होती. मात्र सुदैवाने थॉमसला गंभीर दुखापत झाली नव्हती. डॉक्टरांनी त्याला आरामाच सल्ला दिला होता.

7 / 7

अपघातामध्ये क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याच्या काही दुर्दैवी घटनाही घडल्या होत्या. वेस्ट इंडिजचा फलंदाज रुनाको मॉर्टन हा अपघातात मृत्यूमुखी पडलेला एक दुर्दैवी क्रिकेटपटू आहे. ४ मार्च २०१२ रोजी झालेल्या एका भीषण अपघातात रुनाको मॉर्टनचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :रिषभ पंतअपघातमोहम्मद शामीआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App