Join us  

Rishabh Pant Car Accident: रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:32 AM

Open in App
1 / 7

भारतीय क्रिकेटर रिषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटेच भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की त्याची मर्सिडीज कार डिव्हाय़डरला आदळून पूर्णपणे जळून खाक झाली. डॉक्टरांनुसार पंतला गंभीर जखमा झाल्या असून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत आहे.

2 / 7

रिषभ पंत एकटाच कारमध्ये होता. तोच कार चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रिषभ पंत अपघातानंतर कारमध्येच अडकला होता. यानंतर लगेचच कारने पेट घेतला. हायवेवरून जाणाऱ्या वाहनचालकांनी थांबून त्याच्या कारची काच तोडली आणि रिषभला बाहेर काढले.

3 / 7

नवी दिल्लीहून रिषभ पंत हा उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. यावेळी वाटेत सव्वा पाचच्या सुमारास त्याची कार वेगाने नारसन बॉर्डरवरील रेलिंगवर आदळली. कारचे दरवाजे जाम झाल्याने रिषभ आतच अडकला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. पाठीलाही जखमा झाल्या आहेत.

4 / 7

कारच्या खिडकीची काच फोडून बाहेर काढल्यानंतर रिषभला लोकांनी तातडीने रुडकीच्या सक्षम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रिषभच्या शरीराला जास्त जखमा नाहीत, परंतू त्याचा एक पाय फ्रॅक्टर असण्याची शक्यता आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते, आता त्याला दिल्लीला नेण्यात येत आहे.

5 / 7

रिषभ पंत स्वत: कार चालवत होता. पहाटेच्या सुमारास त्याला झोप आली आणि काही सेकंदातच त्याची कार अनियंत्रित झाली. यामुळे ती रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली.

6 / 7

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पंतची कार रोड डिव्हायडरची रेलिंग तोडून रस्त्यावर सुमारे 200 मीटर घसरत गेली. यादरम्यान कार अनेक वेळा पलटली. ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुखापतीमुळे त्याला शक्य झाले नाही. स्थानिक लोकांनी त्याला गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले.

7 / 7

रुरकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला त्याच्या आईला सरप्राईज करायचे होते. त्यामुळे रात्री उशिरा तो दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून एकटाच निघाला होता. त्याची प्रकृती ठीक आहे, तो बोलण्याच्या स्थितीत आहे आणि धोक्याच्या बाहेर आहे, असे पोलिसांनी सांगितली.

टॅग्स :रिषभ पंतअपघात
Open in App