Join us  

Rishabh Pant Accident: माणुसकीचा अंत! रक्ताच्या थारोळ्यात पडला होता रिषभ पंत अन् पैसे घेऊन पळाले लोक; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 4:05 PM

Open in App
1 / 9

भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर रिषभ पंत याचा आज भीषण अपघात झाला. या अपघातात रिषभला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात इतका भीषण होता की त्याची कार आगीत जळून खाक झाली आहे. दैव बलवत्तर म्हणावं लागेल की रिषभ पंत इतक्या भीषण अपघातातून बचावला. दिल्ली-डेहरादून महामार्गावर पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.

2 / 9

रिषभ पंतवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून डोक्यावर जखमेचे दोन व्रण आहेत. तसंच पाठीलाही खरचटलं आहे. आता या अपघाताबाबतची माहिती हळूहळू पुढे येऊ लागली आहे. यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

3 / 9

रिषभ पंत रुडकी येथील आपल्या घरी परतत असताना महमार्गाच्या दुभाजकाला कारनं धडक दिली होती. कारची काच फोडून रिषभ कसाबसा बाहेर आला. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता. अपघात स्थळी असलेल्यांपैकी काहींनी रिषभला मदत करायची सोडून त्याच्या जवळील पैसे घेऊन पळ काढल्याचीही माहिती आता समोर आली आहे.

4 / 9

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतच्या कारमध्ये एक बॅग देखील होती ज्यामध्ये काही रोख रक्कम होती. अपघातानंतर पंत जखमी झाला आणि याचदरम्यान काही तरुण तिथं पोहोचले. त्यांनी रिषभला मदत करण्याऐवजी बॅगमधून पैसे काढले आणि तिथून पळ काढला.

5 / 9

हरियाणा रोडवेजच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने ऋषभ पंतच्या कारच्या अपघाताबाबत उत्तराखंड पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच नरसल चेकपोस्टवर तैनात असलेल्या उत्तराखंड पोलीस कर्मचाऱ्यांनी पंतला गाठून प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेले. (पीसी-ट्विटर)

6 / 9

रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला तेव्हा त्याला पहिल्यांदा बस ड्रायव्हरने मदत केली होती. सुशील कुमार नावाच्या बस ड्रायव्हरने रक्तबंबाळ झालेल्या लंगडत लाचणाऱ्या रिषभला हात दिला. अॅम्बुलन्स बोलवून त्याला हॉस्पिटलला पाठविले. परंतू जेव्हा रिषभची कार डिव्हायरवरून पलिकडे कोसळली तेव्हाचा क्षण एवढा भयानक होता की त्या बस ड्रायव्हरने आशाच सोडलेली.

7 / 9

रिषभची कार अपघातग्रस्त झाली तेव्हा रिषभ स्वत: विंड स्क्रीन तोडून कारच्या बाहेर आला. यानंतर कारला आग लागल्याचे त्याने सांगितले होते. आता बस चालकाने अपघात घडत असताना पाहिल्याचे सांगितले आहे. पण रिषभला मदत करण्याऐवजी अशा गंभीर प्रसंगी अपघातग्रस्ताजवळील वस्तूंची लूट करणाऱ्या त्या तरुणांचा शोध घेण्याचीही मागणी आता चाहते करू लागले आहेत.

8 / 9

रिषभच्या पायाला फ्रॅक्चर आहे. तर डोक्यालाही जखम झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे अपघात जितका भीषण होता ते पाहता रिषभचा जीव वाचला हे महत्वाचं आहे. अपघातानंतर रिषभच्या कारनं पेट घेतला होता. रिषभ वेळीच कारमधून बाहेर पडला नसता तर आज भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं.

9 / 9

एका बाजूला प्रसंगाचं गांभीर्य न ओळखता क्षणीक सुखासाठी पैसे घेऊन पळालेल्या त्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासला. तर दुसरीकडे एका बस ड्रायव्हरनं देवदूतासारखं धावून येत रिषभला मदत केली आणि त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :रिषभ पंत
Open in App