Join us  

Rishabh Pant No Ball Controversy : ... ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुला दोषी ठरवतायेत!; रिषभ पंतच्या बचावासाठी गर्लफ्रेंड Isha Negi ने लिहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 3:57 PM

Open in App
1 / 9

Rishabh Pant No Ball Controversy : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात शुक्रवारी मोठा राडा झाला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) याने अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. दिल्लीच्या ताफ्यातील प्रत्येक जण संतापला होता.

2 / 9

सहाय्यक प्रशिक्षक प्रविण अमरे ( Pravin Amre) यांनी थेट मैदानावर धाव घेताना अम्पायरशी हुज्जत घातली. त्यांना शार्दूल ठाकूरचीही साथ मिळाली. या सर्वांवर बीसीसीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयपीएलच्या नियमांचा भंग केल्या प्रकरणी या तिघांवरही कारवाई करण्यात आली आहे.

3 / 9

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातीव २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हा सर्व प्रकार घडला. २२२ धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला अखेरच्या ६ चेंडूंवर ३६ धावा करायच्या होत्या आणि रोव्हमन पॉवेलने २०व्या षटकातील पहिले तीन चेंडू षटकार खेचले.

4 / 9

तिसरा चेंडू फुलटॉस होता आणि तो No Ball असल्याचा दावा दिल्लीच्या खेळाडूंनी केली. त्यात कर्णधार रिषभने फलंदाजांना माघारी बोलावले. अमरे दाद मागण्यासाठी मैदानावर धावले आणि शार्दूलनेही नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली.

5 / 9

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याला १०० टक्के मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे. म्हणजेच त्याला १.१५ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. पंतने कलम २.७मधील दुसऱ्या स्थराच्या नियमाचा भंग केला आणि त्याने त्याची चूक मान्य केली. शार्दूल ठाकूरला त्याच्या मॅच फीची ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. सहाय्यक प्रशिक्षक अमरे यांना १०० टक्के मॅच फी व एका सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावली गेली आहे.

6 / 9

BCCIच्या या कारवाईनंतर रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी ( Isha Negi) मैदानावर उतरली. तिने जळजळीत पोस्ट लिहून तिचा राग व्यक्त केला. तिने लिहिले की, गडबड तेव्हा होते जेव्हा लोकं स्वतःच्या सन्मानासाठी तुमच्या प्रतिक्रियेला दोषी ठरवतात.

7 / 9

इशा नेगी ही मूळची उत्तराखंडमधील देहरादूनची आहे. ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. इशा नेगी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. इशा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा स्टायलिश फोटो शेअर करत असते. काही पोशाख पाश्चिमात्य असतात तर काही वेळा ती पारंपारिक पोशाखातही फोटो पोस्ट करते.

8 / 9

इशा बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे. इशाचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ ला देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. इशा श्रीमंत राजपूत कुटुंबातून असून तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. Fab X इंजिनिअरिंग असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे.

9 / 9

इशाचे शालेय शिक्षण देहरादूनमधील एका कॉन्व्हेंट शाळेत तर नॉयडाच्या अमिटी महाविद्यालयातून ती कला शाखेची पदवीधर आहे. पदवीचे शिक्षण झाल्यावर तिने इंटेरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं असून ती स्वत:देखील एक यशस्वी उद्योजिका आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स
Open in App