जगातील सर्वात श्रीमंत अशा IPL स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी लिलाव पार पडला. भारताचा रिषभ पंत २७ कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला Lucknow SuperGiants संघाने खरेदी केले.
दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेल्या रिषभ पंतवर लखनौ सुपरजायंट्स संघाने तुफान बोली लावली. अंदाजे २३ कोटींपर्यंत बोली थांबली. त्यानंतर दिल्लीने RTM चा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली. पण LSGने २७ कोटींसह त्याला स्वत:कडेच रोखले.
या खरेदीनंतर LSG चे मालक संजीव गोयंका यांनी मात्र काहीसे वेगळे मत व्यक्त केले. “पंतला संघात घेणे योजनेचा एक भाग होता. पण आम्ही त्याच्यासाठी २६ कोटींची रक्कम निश्चित केली होती. २७ कोटी हा थोडा जास्तच पैसा खर्च झाला.”
दरम्यान, एक महत्त्वाची बाब म्हणजे, या खेळाडूंवर जी बोली लावली जाते, त्यापैकी काही रक्कम ही कराच्या स्वरूपात त्यांच्या मानधनातून वगळली जाते आणि त्या खेळाडूला प्रत्यक्षात कमी रक्कम मिळते.
रिषभ पंतशी लखनौ संघाचा करार दर हंगामाला २७ कोटी रुपयांचा झाला असला तरीही भारत सरकारच्या नियमानुसार, त्याच्या मानधनातून ८.१० कोटी रूपये टॅक्स कापला जाणार असून त्याचे मानधन केवळ १८ कोटी ९० लाख रुपये इतकेच असणार आहे.