Join us  

Riyan Parag Harshal Patel, Biggest Fights in IPL History: फुल्ल ऑन राडा!! 'हे' आहेत IPL इतिहासात मैदानावर गाजलेले मोठे वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 1:26 PM

Open in App
1 / 7

हर्षल पटेल - रियान पराग (Harshal Patel Riyan Parag) - सध्याच्या हंगामात मंगळवारी झालेल्या सामन्यात रियान परागने हर्षल पटेलला शेवटच्या षटकार सिक्सर लगावला. त्यानंतर हर्षल त्याच्यावर चिडला आणि त्याच्या अंगावर धावून गेला. पण अखेर इतर खेळाडूंनी या दोघांनाही रोखले. याच निमित्ताने पाहुया IPLच्या इतिहासातील गाजलेले राडे.

2 / 7

हरभजन सिंग - श्रीसंत (Harbhajan Singh Sreesanth): IPLच्या सुरूवातीच्या सीझनमध्ये पंजाबने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यानंतर रागाच्या भरात हरभजनने श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. या कृत्यामुळे हरभजनला उर्वरित ११ सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.

3 / 7

विराट कोहली - गौतम गंभीर (Virat Kohli Gautam Gambhir): 2013 साली झालेल्या IPL मध्ये बंगलोरचा संघ आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी विराटची विकेट पडल्यावर गंभीरने आरडाओरडा करत आनंद साजरा केला. त्यावेळी गंभीर आणि कोहली यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. एकमेकांबाबत त्यांनी अपशब्द उच्चारले. अखेर पंच आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करून भांडणं थांबवलं.

4 / 7

किरॉन पोलार्ड - मिचेल स्टार्क (Kieron Pollard Mitchell Starc): मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्ड आणि बंगलोरचा मिचेल स्टार्क यांच्यात IPL 2014 मध्य मोठा राडा झाला होता. सामन्यात पोलार्डला स्टार्कने आधी डिवचलं. त्यानंतर स्टार्क गोलंदाजीचा रन अप घेत धावल्यावर पोलार्ड बाजूला झाला. स्टार्कला ते रूचलं नाही त्यामुळे त्याने चेंडूत रागाने त्याच्या अंगावर भिरकवला. त्या घटनेने पोलार्डही संतापला आणि त्याने स्टार्कच्या अंगावर बॅट उगारली आणि त्याच्यापासून जाणीवपूर्वक थोडीशी लांब फेकली.

5 / 7

अमित मिश्रा - मुनाफ पटेल (Amit Mishra Munaf Patel) - IPL 2011 मध्ये एका सामन्यात मुनाफ पटलेच्या दोन चेंडूवर अमित मिश्राने दोन चौकार मारले. ही बाब मुनाफला रूचली नव्हती. त्यामुळे तो अमित मिश्राला रागात काहीतरी बोलला. डेक्कन चार्जर्सकडून खेळणारा अमित मिश्राने देखील या गोष्टीला प्रत्युत्तर दिलं आणि काही काळासाठी त्यांच्या वाद झाल्याचं दिसून आलं.

6 / 7

हरभजन सिंग - अंबाती रायुडू (Harbhajan Singh Ambati Rayudu): प्रतिस्पर्धी संघामधील खेळाडूंमध्ये भांडण किंवा वाद होणं हे स्वाभाविक आहे. पण IPL 2016 मध्ये मुंबई इंडियन्सच्याच दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. हरभजनच्या गोलंदाजीवर रायुडूने एक चौकार अडवला. पण हरभजनला त्याचे प्रयत्न फारसे आवडले नाहीत. त्यामुळे तो चिडला. त्याला पाहून रायुडूही संतापला. पण अखेर हरभजननेच वाद शांत केला आणि रायुडूला पुन्हा फिल्डिंगसाठी जाण्याची विनंती केली.

7 / 7

विराट कोहली - आर अश्विन (Virat Kohli R Ashwin): विराट कोहली हा आक्रमकपणासाठी ओळखला जातो. IPL 2019 मध्ये अश्विन एका सामन्यात बाद झाला. त्यावेळी एक प्रकार घडला. पंजाबला एका षटकात २७ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याचा झेल घेतल्यानंतर विराटने जल्लोष केला, तर अश्विनने डगआऊटमध्ये जाताना ग्लोव्ह्ज फेकत राग व्यक्त केला. परंतु, हा वाद सामना संपताच मिटल्याचे दिसले आणि दोन्ही खेळाडूंनी परिपक्वता दाखवत वादावर पडदा टाकला.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीगौतम गंभीरहरभजन सिंगकिरॉन पोलार्ड
Open in App