Join us

Road Safety World Series 2021: सचिन-वीरूची जोडी, पठाण बंधूंची फटकेबाजी; क्रिकेटचे दिग्गज आजपासून 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये!

By स्वदेश घाणेकर | Updated: March 5, 2021 10:04 IST

Open in App
1 / 11

कोरोना व्हायरसमुळे वर्षभर स्थगित करण्यात आलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( Road Safety World Series) स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २०२०मध्ये चार सामन्यांनंतर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यात ऑस्ट्रेलिया संघानंही माघार घेतली. पण, या सर्व अडचणींवर मात करून आजपासून ही सीरिज सुरू होत आहे.

2 / 11

इंग्लंड लिजंड आणि बांगलादेश लिजंड अशा दोन नवीन संघांसह सहा संघांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन हा इंग्लंड लिजंड आणि मोहम्मद रफिक हा बांगलादेश संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

3 / 11

स्पर्धेचा पहिलाच सामना भारत विरुद्ध बांगलादेश असा होणार आहे आणि सचिन तेंडुलकर टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. सचिनसह वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, नमन ओझा, विनय कुमार, युसूफ पठाण हेही फटकेबाजी करताना दिसतील. स्पर्धेचे सर्व सामने रायपूर येथील शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

4 / 11

५ मार्चपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत १२ सामने खेळवण्यात येतील. २१ मार्चला अंतिम सामना खेळवण्या येईल. Colors Cineplex आणि Rishtey Cineplex या चॅनेलवर स्पर्धेचे सामना दाखवण्यात येईल. शिवाय Voot अॅपवरही मॅच पाहता येईल. सायंकाळी ७ वाजल्यापासून सामने सुरू होतील.

5 / 11

इंग्लंड संघ England Legends - केव्हीन पीटरसन ( कर्णधार), ओवैस शाह, फिलीप मस्टर्ड, माँटी पानेसर, निक कॉप्टन, कबीर अली, उस्मान अफझाल, मॅथ्य होगार्ड, जेम्स तिंडाल, क्रिस ट्रेम्लेट, साजीद महमूद, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस स्कोएफिल्ड, जॉनथन ट्रॉट, रियान साईडबॉटम

6 / 11

बांगलादेश संघ Bangladesh Legends - मोहम्मद रफीक ( कर्णधार), खालेद महमूद, मोहम्मद शरीफ, मुश्फीकर रहमान, ममून उर राशेद, नफीस इक्बाल, अब्दुर रझाक, खालेद माशूद, हन्नान सरकार, जावेद ओमार, राजीन सालेह, मेहराब होसैन, आफ्ताब अहमद, अलमगीर कबीर

7 / 11

वेस्ट इंडिज संघ West Indies Legends - ब्रायन लारा ( कर्णधार), दिनानाथ रामनरीन, अॅडम सॅनफोर्ड, कार्ल हूपर, ड्वेन स्मिथ, रियान ऑस्टीन, विलियम पर्कीन्स, महेंद्र नागामूटू, पेड्रो कॉलिन्स, रिडली जेकब, नरसिंग देवनरीन, टीनो बेस्ट, सुलेमान बेन

8 / 11

दक्षिण आफ्रिका संघ South Africa Legends - जाँटी ऱ्होड्स ( कर्णधार), मोर्ने व्हॅन विक, अलव्हीरो पीटरसन, निकी बोए, अँड्य्रू पुट्टीक, थंडी टीशाबालाल, लूट्स बोस्मन, लॉयड नॉरीस जोन, झँडर डी ब्रूयन, मोंडे झोंडेकी, गार्नेट क्रुगर, रॉजर तेलेमाशूस, मखाया एनटीनी, जस्टीन केम्प

9 / 11

भारतीय संघ India Legends- सचिन तेंडुलकर ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, नमन ओझा, झहीर खान, प्रग्यान ओझा, नोएल डेव्हीड, मुनाफ पटेल, इरफान पठाण, मनप्रीत गोनी

10 / 11

श्रीलंका संघ Sri Lanka Legends - तिलकरत्ने दिलशान ( कर्णधार), उपुल थरंगा, चमारा सिल्वा. चिंथका जयासिंघे, थिलान तुषारा, नुवान कुलसेकरा, रसेल अर्नोल्ड, अजंथा मेंडीस, फरवीज महरूफ, सनथ जयसूर्या, मंजुला प्रसाद, मलिंदा वर्नापुरा, धम्मिका प्रसाद, रंगना हेराथ, चमारा कपुगेदरा, धुलांदना विजेसिंघे

11 / 11

टॅग्स :सचिन तेंडुलकरयुवराज सिंगइरफान पठाणयुसुफ पठाणविरेंद्र सेहवागमुनाफ पटेलभारतश्रीलंकाबांगलादेशइंग्लंडवेस्ट इंडिजद. आफ्रिका