Join us

Roger Binny 5 unknown facts: रॉजर बिन्नी होणार BCCIचे नवे अध्यक्ष, जाणून घ्या त्यांच्याबद्दल ५ खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:48 IST

Open in App
1 / 6

Roger Binny 5 unknown facts: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे (BCCI President) अध्यक्ष होण्यासाठी सज्ज झाले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली गेल्या ३ वर्षांपासून या पदावर कार्यरत होता, तो ऑक्टोबरच्या बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत पदभार सोडणार असून त्याची जागा रॉजर बिन्नी घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. या निमित्ताने जाणून घेऊया रॉजर बिन्नी यांच्याबद्दलच्या ५ रंजक गोष्टी-

2 / 6

१. रॉजर बिन्नी हे मध्यमगती गोलंदाज होते. 1983 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाचे ते शिल्पकार ठरले होते. त्यांनी आठ सामन्यांत तब्बल १८ विकेट घेतल्या. त्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ते सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले होते.

3 / 6

२. रॉजर बिन्नी हे टीम इंडियाचा माजी क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीचे वडील आहेत. तसेच, लोकप्रिय आण ग्लॅमरस स्पोर्ट्स अँकर मयांती लँगर (Mayanti Langer Binny) हिचे ते सासरे आहेत.

4 / 6

३. रॉजर बिन्नी हे २०१४ साली BCCIच्या निवड समिती सदस्यपदी होते. पण त्यांना त्यांचा पदाचा मध्येच राजीनामा द्यावा लागला होता, कारण त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी याचा संघातील समावेश त्यावेळी वादाचा विषय ठरला होता.

5 / 6

४. १९७९ च्या पाकिस्तान विरुद्धच्या घरच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्यांनी बंगळुरू येथे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑक्टोबर १९८७ साली त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

6 / 6

५. रॉजर बिन्नी १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या BCCIच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी निवडले जाणे जवळपास निश्चित आहे, कारण त्यांच्या विरोधात त्या पदासाठी इतर कोणीही अर्ज भरलेला नाही. याशिवाय भाजपाचे आमदार आशिष शेलार BCCIचे खजिनदार म्हणून कारभार पाहणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डबीसीसीआयमयंती लँगरसौरभ गांगुली
Open in App