घरच्या मैदानात सर्वाधिक टेस्ट मॅच गमावणारा दुसरा कॅप्टन ठरला रोहित; इथं पाहा रेकॉर्ड

रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीपची नामुष्की ओढावली आहे. न्यूझीलंडच्या संघानं घरच्या मैदानात टीम इंडियाला ३-० अशी मात देत नवा इतिहास रचला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह रोहित शर्माच्या नावे कॅप्टन्सीतील लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद झाली.

घरच्या मैदानात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या कॅप्टन्सच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. एक नजर टाकुयात कुणाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात किती सामने गमावले त्यासंदर्भातील खास रेकॉर्ड्सवर

घरच्या मैदानात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत मन्सूर अली खान पतौडी अव्वलस्थानी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला घरच्या मैदानात २७ पैकी ९ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात १६ सामने खेळले आहेत. यात ५ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला घरच्या मैदानात प्रत्येकी ४-४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात ८ पैकी ३ सामने गमावले होते.

भारतीय संघाची बांधणी करणारा कर्णधार अशी ओळख असलेल्या सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला घरच्या मैदानात २१ पैकी ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात १२ पैकी ३ सामने गमावल्याचा रेकॉर्ड आहे.