IND vs SL: रोहित शर्मा तिसऱ्या वनडेत करणार मोठा पराक्रम, ख्रिस गेलचा विक्रम मोडणार!

Rohit Sharma, IND vs SL 3rd ODI: भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना उद्या होणार आहे.

Rohit Sharma, IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या खेळला जाणार आहे. पहिला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत भारताला हरवले.

सध्या यजमान श्रीलंकेचा संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यावर भारतीय संघाची नजर असणार आहे. याशिवाय तिसऱ्या सामन्यात 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा मोठा विक्रमही मोडण्याची संधी रोहित शर्माकडे असणार आहे.

क्रिकेट जगतातील स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल हा वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने वनडेमध्ये ३३१ षटकार मारले आहेत.

सर्वाधिक वनडे षटकारांच्या बाबतीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पहिल्या स्थानी आहे. आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतमध्ये एकूण ३५१ षटकार खेचले आहेत. त्यापाठोपाठ ख्रिस गेल दुसऱ्या स्थानी आहे.

रोहित शर्मा गेलचा विक्रम मोडण्याच्या फक्त दोन शॉट्स दूर आहे. रोहित शर्माने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण ३३० षटकार ठोकले आहेत. तो गेल पेक्षा केवळ २ षटकार दूर आहे. तिसऱ्या सामन्यात दोन षटकार मारून रोहित वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा फलंदाज बनू शकतो.