Join us  

ट्वेंटी-20त रोहित शर्माच 'हिट'; पाहा थक्क करणारे विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 1:01 PM

Open in App
1 / 6

दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतानं डकवर्थ लुईसनुसार वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा केल्या होत्या. पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मानं विश्वविक्रम नावावर केला. ट्वेंटी-20तील आता सर्वच विक्रम हिटमॅन रोहितच्या नावावर झाले आहेत.

2 / 6

ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चार शतकांचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये रोहितनं 4 शतकं केली आहेत. ख्रिस गेल आणि कॉलीन मुन्रो यांच्या नावावर प्रत्येकी 3-3 शतकं आहेत.

3 / 6

रोहितनं रविवारी 67 धावांची खेळी करून ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2400 धावांचा पल्ला ओलांडला. रोहितच्या नावावर आता 2422 धावा झाल्या आहेत आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2400 धावांचा पल्ला ओलांडणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

4 / 6

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार व षटकार खेचण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहेत. त्यानं 107 षटकार व 215 चौकार खेचले आहेत आणि त्याच्या नावावर एकूण 322 चौकार + षटकार आहेत.

5 / 6

ट्वेंटी-20त सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या फलंदाजाचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला आहे. त्यानं एकूण 21 वेळ 50+ धावा केल्या आहेत. त्यानंतर कॅप्टन विराट कोहलीचा ( 20) क्रमांक येतो.

6 / 6

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 105 षटकारांचा गेलचा विक्रम रोहितनं काल मोडला. 107 - रोहित शर्मा ( भारत); 105 - ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज); 103 - मार्टिन गुप्तील ( न्यूझीलंड); 92 - कॉलिन मुन्रो ( न्यूझीलंड ); 91 - ब्रेंडन मॅकलम ( न्यूझीलंड )

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीख्रिस गेल