'हिट'मॅनची संघर्षगाथा! क्रिकेटर होण्यासाठी दूध विकायचा, पै न् पैसाठी खूप खस्ता खाल्ल्या; जवळच्या मित्रानं सारं सांगितलं...

रोहित शर्मा आज क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराच्या फलंदाजीच्या पराक्रमाला सर्वजण सलाम करतात. रोहित शर्मा हे केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही तर आयपीएलमध्येही मोठं नाव आहे. या खेळाडूनं आपल्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.

तुम्हाला माहित आहे का की आज संपूर्ण जग ज्या रोहितचा जयजयकार करतं तो एकेकाळी पैन् पैसाठी तळमळत होता. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि रोहित शर्माचा बालपणीचा मित्र प्रग्यान ओझानं हा खुलासा केला आहे.

प्रग्यान ओझानं खुलासा केला की, रोहित शर्मा कधीही त्याच्या संघर्षाबद्दल कोणालाही सांगत नाही. कारण त्याला कोणाची सहानुभूती नको असते. यावरून त्याचं मोठंपण दिसून येतं. रोहित शर्मानं त्याच्या आयुष्यात असं सर्व काही पाहिले आहे ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.

प्रग्यान ओझानं खुलासा केला की, रोहित शर्मानं दूध विकण्याचंही काम केलं आहे. नवीन क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी त्यानं दूध विकण्याचं काम केलं होतं. रोहित शर्मा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याला क्रिकेटसाठी घरापासून दूर राहावं लागलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माच्या वडिलांची कमाई जास्त नव्हती, त्यामुळे तो आजोबांकडे राहत असे. रोहितची ही कहाणी बहुतेक चाहत्यांना माहीत आहे, पण प्रग्यान ओझानं जे सांगितलं त्यातून रोहितच्या खडतर मेहनतीची कल्पना येते.

रोहित शर्मानं क्रिकेटवरील प्रेमापोटी आपल्या खडतर काळात क्रिकेट किट विकत घेण्यासाठी दूध पोहोचवण्याचं काम केलं असलं तरी आज या खेळाडूवर पैशांचा पाऊस पडत आहे. रोहितनं आयपीएलमध्ये १७८.६ कोटी रुपये कमावले आहेत, जे विराट आणि धोनीपेक्षाही जास्त आहेत.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन बनवलं आहे. एवढंच नाही तर त्यानं डेक्कन चार्जर्सकडून २०८ मध्ये आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. यावेळीही त्याचे लक्ष्य पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्याचं असेल. गेल्या वेळी रोहित अँड कंपनीनं निराशा केली होती. पण यावेळी मुंबई कमबॅक करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.