Rohit Sharma, IND vs SL T20 : Virat Kohli संघात नसल्याचा रोहित शर्मालाच होणार मोठा फायदा... विश्वास बसत नसेल तर 'ही' बातमी वाचाच

विराट कोहलीला श्रीलंका मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने श्रीलंका विरूद्धच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती घेतली आहे. पण विराट ही मालिका खेळत नसल्याने रोहित शर्माला मात्र ते फायद्याचंच ठरणार आहे. तुम्हाला ही गोष्ट पटत नाहीये? तर मग पुढे वाचाच...

रोहित आणि विराट हे दोघेही टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जातात. विराट आणि रोहित यांच्यात नेहमीच धावांच्या बाबतीत एक निकोप स्पर्धा पाहायला मिळते.

वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात रोहित शर्माने दमदार खेळी करण्यास सुरूवात केली होती आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये विराटला मागं टाकलं होतं.

पण त्यानंतर विराट मैदानात आला अन् रोहित बाद झाला. त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत विराटने रोहितला पुन्हा मागे टाकलं. पण श्रीलंका दौऱ्यावर मात्र अशी गोष्ट घडणार नाही.

रोहितकडे टी२० क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत अव्वल बनण्याची आता सुवर्ण संधी आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आणखी ३७ धावा केल्या, तर तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो.

सध्या रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल हा (३ हजार २९९ धावांसह अव्वल तर भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली ३ हजार २९६ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

भारताला श्रीलंकेविरुद्ध तीन टी२० सामने खेळायचे आहे. यात सामन्यांमध्ये जर रोहितने ३७ धावांचा पल्ला गाठला तर तो या दोन्ही फलंदाजांना सहज पार करू शकतो आणि नवा पराक्रम करू शकतो.