Rohit Sharma Injury : रोहित शर्माने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूला झापले, बिचाऱ्याने ड्रेसिंग रुममध्ये स्वतःला कोंडून घेतले अन्...

Rohit Sharma Injury भारतीय संघाला मंगळवारी मोठा धक्का बसला असता, परंतु रोहित शर्मा ( Rohit sharma) ची दुखापत थोडक्यावर निभावली.

Rohit Sharma Injury भारतीय संघाला मंगळवारी मोठा धक्का बसला असता, परंतु रोहित शर्मा ( Rohit sharma) ची दुखापत थोडक्यावर निभावली. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी भारतीय संघ एडिलेड येथे दाखल झाला आणि आज सरावालाही सुरुवात केली. पण, सराव सत्रात रोहितच्या हातावर चेंडू आदळला अन् संघ व्यवस्थापनाच्या काळजाचा ठोका चूकला.

रोहितला दुखापत झाल्याचे पाहताच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, फिजिओ त्याच्या दिशेने धावले. रोहित हात झटकत कळवळत होता. त्याने त्वरीत सराव सत्रातून माघार घेतली आणि प्राथमिक उपचार केल्यानंतर रोहित एका बाजूला बसून राहिला. त्याने हातावर आईस पॅकने शेक घेतला. १५-२० मिनिटानंतर तो पुन्हा सरावासाठी आला. दरम्यान, रोहितने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघू याला खूप झापले.

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक आज नेट्समध्ये सराव करत होते. पण, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघून टाकेलल्या चेंडूवर रोहितला दुखापत झाली. रघूने टाकलेला शॉर्ट पिच चेंडू रोहितच्या हातावर जाऊन आदळला. याआधीचा चेंडू रघूने यॉर्कर फेकला होता आणि त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू फेकला.

१२०kph च्या वेगाने आलेला चेंडूवर रोहितला दुखापत झाली. विक्रम राठोड व गोलंदाजी प्रशिक्षक पासर म्हाम्ब्रे रोहितच्या दिशेने पळत आले. फिजिओ कमलेश जैन व टीम डॉक्टरही तेथे दाखल झाले. त्यांनी रोहितच्या हातावर आईस पॅक लावला आणि ४० मिनिटे तो एका कोपऱ्यात बसून राहिला.

प्रत्यक्ष लढतीत प्रतिस्पर्धी विविध प्रकारे चेंडू टाकू शकतो, परंतु नेट्समध्ये फलंदाजाचा सराव करून घेण्यासाठी एकाच प्रकारचा चेंडू वारंवार टाकला जतो. पण, रोहितने लेंथ डिलिव्हरी टाकण्यास सांगूनही रघू चूक करत होता. अशात रघूने शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि त्यासाठी रोहित तयार नव्हता. नेमका तोच चेंडू रोहितच्या हातावर आदळला. त्यानंतर रोहितने त्याला झापले.

यापूर्वीही रघूच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवाल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, लोकेश राहुल यांना दुखापत झाली होती. मयांकला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते, तर सूर्यकुमारला २ महिने क्रिकेटला मुकावे लागले होते.

थोड्यावेळानंतर रोहित पुन्हा नेट्समध्ये सरावाला आला. तेव्हा त्याला रघू दिसला नाही. त्याने तो कुठेय असे विचारले. त्यावर म्हाम्ब्रे म्हणाले, रोहितकडून बांबूचे फटके मिळाल्यानंतर रघू ड्रेसिंग रुममध्ये गेला. रोहितने त्याला पुन्हा बोलावण्यास सांगितले. रघू येताच अन्य खेळाडूंनी मोठमोठ्याचे चिअर केले. रघूने रोहितची माफी मागितली.

१९९०मध्ये क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन रघू मुंबईत आला. पण, दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपटू बनता आले नाही. त्यानंतर तो पुन्हा बंगळुरू येथे आला आणि तेथे प्रशिक्षकांना मदत करू लागला. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संधी मिळाली. त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यानंतर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांचा थ्रो डाऊन स्पेशालिस्ट बनला. आता तो भारतीय संघासोबत असतो.