Rohit Sharma Ajinkya Rahane, Mumbaikar Captains of Team India : रोहित शर्माच्या आधी टीम इंडियाला किती 'मुंबईकर' कर्णधार मिळालेले माहित्ये का?

विनू मंकड यांच्यापासून सुरू झालेली परंपरा आता रोहितने सुरू ठेवली आहे.

Rohit Sharma, Mumbaikar Captains of Team India : BCCIने एक अपेक्षित निर्णय घेत रोहित शर्माच्या गळ्यात भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची माळ घातली. आता श्रीलंकेविरूद्ध तो कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका खेळणार आहे.

रोहितच्या रूपाने भारताला आणखी एक मुंबईकर कर्णधार लाभला. रोहित हा भारताचा एकूण ३५ वा कसोटी कर्णधार असून हा मान मिळवणारा तो मोजक्या 'मुंबईकर' कर्णधारांपैकी एक ठरला आहे. या निमित्ताने भारताचे नेतृत्त्व केलेल्या 'मुंबईकर' कर्णधारांचा घेतलेला आढावा...

विनू मंकड (१९५४-५५, १९५८-५९) : सामने - ६, विजय - ०, पराभव - १, अनिर्णित - ५, सरासरी - ०.००

पॉली उम्रीगर (१९५५-५६, १९५६-५७, १९५८-५९) : सामने - ८, विजय - २, पराभव - २, अनिर्णित - ४, सरासरी - २५.००

अजित वाडेकर (१९७०-७४) : सामने - १६, विजय - ४, पराभव - ४, अनिर्णित - ८, सरासरी - २५.००

सुनील गावसकर (१९७५-८५) : सामने - ४७, विजय - ९, पराभव - ८, अनिर्णित - ३०, सरासरी - १९.१४

दिलीप वेंगसरकर (१९८७-८९) : सामने - १०, विजय - २, पराभव - ५, अनिर्णित - ३, सरासरी - २०.००

रवी शास्त्री (१९८७-८८) : सामने - १, विजय - १, पराभव - ०, अनिर्णित - ०, सरासरी - १००.००

सचिन तेंडुलकर (१९९६-९७ ते १९९९-२०००) : सामने - २५, विजय - ४, पराभव - ९, अनिर्णित - १२, सरासरी - १६.००

अजिंक्य रहाणे (२०१७ ते २०२१) : सामने -६ , विजय - ४, पराभव - ०, अनिर्णित - २, सरासरी - ६६.६६