"रोहित Mumbai Indians चा कॅप्टन नाहीये, हा हार्दिक पांड्याचा संघ आहे, त्यामुळे... - अंबाती रायुडू

Ambati Rayudu on Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025: मुंबईच्या संघात रोहित आणि हार्दिक यांच्यात अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई इंडियन्स हा संघ IPLमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. पण यंदाच्या हंगामात या संघाला अजून फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव अशा स्टार फलंदाजांचा भरणा आहे. तसेच ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर असे भेदक मारा करणारे गोलंदाजही आहेत.

स्टार खेळाडूंचा समावेश असूनही मुंबईचा पहिल्या ५ पैकी ४ सामन्यात पराभव झाला. मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन मैदानावर जे निर्णय घेत असते त्यावर बरीच चर्चा रंगल्याचे दिसते.

रोहित शर्मा हा उत्तम लीडर, तरीही त्याला फिल्डिंगच्या वेळी संघाबाहेर बसवतात. त्याचा अनुभव हार्दिकच्या कामी येऊ शकेल असे मत माजी क्रिकेटर संजय बांगर यांनी मांडले होते.

या चर्चेत अंबाती रायुडूही बसला होता. त्याने बांगर यांच्या मताशी असहमती दाखवली. तो म्हणाला, "हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी करताना कुणाची गरज आहे असं मला वाटत नाही."

"कर्णधाराला मैदानात एकटं सोडायला हवं. हार्दिकला त्याचे निर्णय त्याला घेऊ दे. गेल्या वर्षीप्रमाणे मुंबईच्या एकाच संघात १० जण कॅप्टनसारखे वागले तर मग पुन्हा गोंधळ होईल."

"रोहित हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. भारताचा सामना असतो तेव्हा तो निर्णय घेत असतो. त्यामुळे IPLच्या स्पर्धे दरम्यानही तसेच घडणार, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे."

"रोहित हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन नाहीये. हा संघ हार्दिक पांड्याचा आहे. त्यामुळे हार्दिकला हवे तसे निर्णय घेऊदेत. हार्दिकला जे योग्य वाटतं तेच घडायला हवं," असं रायुडू म्हणाला.