Join us

तुला लाज वाटते की नाही?; युजवेंद्र चहलच्या 'त्या' कृतीवर रोहित शर्मानं खेचले कान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 14:46 IST

Open in App
1 / 9

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे बरेच खेळाडू कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत.

2 / 9

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आपला विरंगुळा दूर करताना लाईव्ह चॅटद्वारे चाहत्यांशी संवाद साधत आहेत. पण, युजवेंद्र चहलचं काही वेगळेच सुरू आहे आणि त्याच्या एका कृतीवर रोहितनं त्याचे कान खेचले आहेत.

3 / 9

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित आणि जसप्रीत बुमराह यांनी काही दिवसांपूर्वी एकमेकांशी लाईव्ह चॅटींग केले. यात दोघांनीमुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित आणि जसप्रीत बुमराह यांनी काही दिवसांपूर्वी एकमेकांशी लाईव्ह चॅटींग केले. यात दोघांनी बऱ्याच गप्पा मारल्या. बऱ्याच गप्पा मारल्या.

4 / 9

यावेळी दोघांनी रिषभ पंत आणि युजवेंद्र चहल यांची फिरकी घेतली. रिषभ पंतनं सर्वात लांब षटकार मारण्याचं चॅलेंज दिल्याचं बुमराहनं रोहितला सांगितले.

5 / 9

रोहित त्यावर म्हणाला,''क्रिकेट खेळायला सुरूवात करून एक वर्ष झालं नाही आणि मला चँलेंज देतो.''

6 / 9

पण, याच चर्चेत चहलचा विषय निघाला आणि रोहितनं कान खेचले.

7 / 9

रोहित आणि चहल यांच्यात सोशल मीडियावर नेहमीच कानउघडणी सुरू असते. पण, यावेळी रोहितनं केलेला कानउघडणी चहलच्या एका कृतीवरून होती.

8 / 9

भारताच्या फिरकीपटूनं नुकताच एक टिक टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यात चहल त्याच्या वडिलांना डान्स स्टेप्स शिकवत आहे.

9 / 9

चहलच्या या व्हिडीओवर रोहितनं त्याचे कान खेचले. तो म्हणाला,''चहल तू तुझ्या वडिलांनाही नाचवत आहेस, तुला लाज वाटते की नाही?''

टॅग्स :रोहित शर्मायुजवेंद्र चहलटिक-टॉकजसप्रित बुमराह