Join us  

Rohit Sharma Rested in IND vs SA T20: "रोहितला आता विश्रांती देण्याची काहीच गरज नव्हती"; भारतीय माजी क्रिकेटपटूचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 6:29 PM

Open in App
1 / 6

Rohit Sharma Rested in IND vs SA T20: भारतीय संघाची ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२० मालिका रंगणार आहे. दिल्लीच्या मैदानावरून या ५ सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे.

2 / 6

IPL आणि भविष्यातील व्यस्त वेळापत्रक पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही या मालिकेसाठी आराम दिला आहे. संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे असणार आहे.

3 / 6

टीम इंडियाचे नेतृत्व राहुलकडे देण्याबाबत कोणाचीही हरकत नाही, पण रोहित शर्माला आता विश्रांती गरज अजिबातच नव्हती असं विधान भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने केलं आहे.

4 / 6

'रोहितने ही टी२० मालिका खेळायला हवी होती. विश्रांती घ्यावी की नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला वाटतं की रोहितला आता तरी विश्रांती देण्याची अजिबातच गरज नव्हती', असे माजी वेगवान गोलंदाज रूद्र प्रताप सिंह (RP Singh) म्हणाला.

5 / 6

'आफ्रिकेविरूद्धची मालिका मोठी आहे. अशा वेळी नियमित कर्णधाराने संघात असायला हवं होतं. IPLमध्येही रोहितला ४०० धावांवर मजल मारता आलेली नाहीये. कामगिरीतील सातत्य मिळवणं महत्त्वाचं आहे. या मालिकेत त्याला कदाचित सूर सापडला असता', असा अंदाजही आरपी व्यक्त केला.

6 / 6

भारताचा टी२० संघ- लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार) दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल
Open in App