Rohit Sharma on workload management: BCCIच्या थकवणाऱ्या वेळापत्रकावर रोहित शर्मा व्यक्त झाला; संजू सॅमसनबाबतही केलं विधान

Rohit Sharma on workload management: भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर मत व्यक्त केले.

Rohit Sharma on workload management: भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर मत व्यक्त केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळणार आहे आणि त्याचा खेळाडूंचा वर्कलोड वाढणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय संघ जवळपास ३० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. त्याशिवाय आयपीएल २०२२ आहेच.. त्यामुळे रोहित शर्माने आज वर्कलोडचा मुद्दा उपस्थित केला.

भारताच्या तीनही स्वरूपाच्या संघाचे कर्णधारपद मिळाल्याचा प्रचंड अभिमान आहेच. आता पुढे अनेक आव्हान आहेत. कर्णधारपदाची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. आमच्याकडे तगड्या खेळाडूंचा बंच आहे आणि त्यांना सोबत घेऊन संघाला यश मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.

उप कर्णधार फलंदाज आहे की गोलंदाज, याने काहीच फरक पडत नाही. महत्त्वाचे काय, तर त्या खेळाडूला क्रिकेट ब्रेन असायला हवं. मी जसप्रीत बुमराहला चांगला ओळखतो आणि त्याच्याकडे कोणतं क्रिकेटींग ब्रेन आहे हे मी जाणून आहे.

संजू सॅमसनकडे प्रचंड प्रतिभा आहे. आयपीएलमध्ये त्याचा अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिलतो आणि त्याची चर्चा होते. आता या प्रतिभेचं काय करायचं हे संजूवर अवलंबून आहे. त्याचे बॅक फूट फटके अप्रतिम आहेत.

वर्कलोड मॅनेजमेंटबाबत माझ्या डोक्यात स्पष्ट चित्र आहे आणि त्यादृष्टीने मला वाटचाल करायची आहे. वर्कलोड मॅनेजमेंट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येकाला काळजी घ्यायला हवीच. त्यासाठी आम्हीही रोडमॅप तयार करतोय. सर्व सामने खेळण्याचा माझा प्रयत्न असेल.

रणजी करंडक स्पर्धेत धावा करत राहा, तुम्हाला संधी मिळेल.. धावा करत राहणे हे तुमचे काम आहे, ते तुम्ही कारच. पण, टीम काम्बिनेशनही तितकेच महत्त्वाचे आहे.

हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे... तो चांगल्या फॉर्मात आहे, परंतु अनेक लोकं संधीच्या शोधात आहेत. पण, मला सूर्यासाठी वाईट वाटतं. दुखापतीवर तुमचं नियंत्रण नसते. मीही अनेकदा दुखापतग्रस्त झालो आणि पुनरागमन केले. दुखापतीनंतर पुनरागमन करणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे दुखापत टाळणे हेच हातात आहे आणि खेळाडूंना रोटेट करून त्यांना हवा तो अनुभव देणे महत्त्वाचे आहे.

आयपीएलमध्ये ऋतुराज व इशान त्यांच्यात्यांच्या फ्रँचायझींसाठी सलामीला खेळतात म्हणून तिसऱ्या सामन्यात मी त्यांना सलामीला खेळण्याची संधी दिली . माझा एक डोळा वर्ल्ड कपवर आहे, परंतु फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करून चालणार नाही. तुम्हाला वर्तमानकाळावरही लक्ष ठेवावे लागेल.