Rohit Sharma on Mumbai Indians Win, Danial Sams: एका ओव्हरमध्ये ३५ रन्स देणाऱ्या सॅम्सला शेवटचं षटक का दिलंस? ऐका रोहित शर्माचं सुंदर उत्तर

डॅनियल सॅम्सने शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्या फक्त ३ धावा

Rohit Sharma on Mumbai Indians Win: यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी असलेल्या गुजरात टायटन्स संघाला शुक्रवारी पराभवाचा सामना करावा लागला. ९ पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने दहाव्या सामन्यात आपला दुसरा विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सने गुजरातवर विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. "शेवटच्या टप्प्यात सामना खूपच रंगतदार आणि अटीतटीचा झाला. पण आम्ही ज्या विजयाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो विजय मिळाल्याने समाधान वाटलं."

"आम्ही पराभूत होत होतो, पण कधी ना कधी आमचं नशीब बदलेल हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही दमदार कामगिरी केली. आम्ही ज्या प्रकारे सुरूवात केली त्यानुसार शेवटी आमच्या १५-२० धावा कमीच पडल्या. त्या परिस्थितीत गुजरातच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली."

"टीम डेव्हि़डने फिनिशरची भूमिका चोख पार पाडली. सध्याची संघाची परिस्थिती पाहता त्याने स्वत:वर विश्वास ठेवला आणि संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली यासाठी त्याचं कौतुक केलंच पाहिजे."

"खेळ नक्की कशाप्रकारे पुढे जातो त्यावर बरंच काही अवलंबून असतं. त्या दिवशी कोण चांगली गोलंदाजी करतं त्याच्यावर सामन्याचा निकाल कळून येतो. आज माझ्याकडे गोलंदाजीसाठी चांगले आणि समर्पक पर्याय होते त्यामुळे मला त्याचा फायदा झाला. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, वेगात बदल केले. त्यामुळे फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. त्यांनीही तेच केलं होतं."