Join us  

Rohit Sharma stats: T20 का किंग कौन... हिटमॅन! रोहित शर्माचे 'हे' रेकॉर्ड्स एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 8:40 PM

Open in App
1 / 9

Rohit Sharma Records in T20 Cricket: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. रोहितने २००७च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतून टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यास सुरूवात केली. टीम इंडियाने तो वर्ल्ड कप जिंकला, पण रोहित मात्र त्यानंतर काही काळ गायब झाला.

2 / 9

पहिलावहिला टी२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील खेळाडू असलेला रोहित शर्मा २०११च्या वन-डे वर्ल्ड कपच्या वेळी चर्चेतही नव्हता. यातून धडा घेत रोहितने प्रचंड परिश्रमाच्या जोरावर भारतीय संघात दमदार पुनरागमन केले. आता तर तो टीम इंडियाचा कर्णधार असून टी२० मधील त्याचे पराक्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत.

3 / 9

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या अनेक बाबतीत 'टी२० क्रिकेटचा किंग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आगामी टी२० वर्ल्ड कपसाठी तो पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाहूयात मुंबईच्या 'हिटमॅन'चे काही खास पराक्रम आणि विक्रम...

4 / 9

आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा धावांच्या बाबतीत अव्वलस्थानी आहे. रोहितच्या नावावर सर्वात जास्त म्हणजेच ३ हजार ६२० धावा आहेत.

5 / 9

टी२० क्रिकेट हा अतिशय वेगवान खेळ आहे. पण अशा खेळातदेखील रोहित शर्माच्या नावावर तब्बल ४ शतके आहेत. रोहितची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ११८ आहे.

6 / 9

संघाला वेगवान सुरूवात करून देणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद म्हणजेच ३५ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम संयुक्तपणे रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितसोबत दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि मूळचा श्रीलंकन पण चेक रिपब्लिककडून खेळणारा विक्रमसेकरा यांनीही हा पराक्रम केला आहे.

7 / 9

२००७ साली आपल्या कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर सर्वात जास्त म्हणजेच १३६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्याचा विक्रम आहे. या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक हा १२४ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

8 / 9

नावाप्रमाणेच 'हिटमॅन' असलेल्या रोहित शर्मा टी२० क्रिकेटमध्ये षटकारांची बरसात केली आहे. त्यामुळे या यादीत १७१ टी२० षटकारांच्या जोरावर तो दुसऱ्या स्थानी आहे. पण अव्वलस्थानी असलेल्या मार्टिन गप्टीलपेक्षा तो केवळ एका षटकाराने मागे आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत तो हा विक्रम नक्कीच आपल्या नावावर करेल, अशी चाहत्यांना खात्री आहे.

9 / 9

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक चौकारांच्या बाबतीतही रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नावावर ३२३ चौकार आहेत, तर अव्वलस्थानी असलेल्या आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावे ३४४ चौकार आहेत. (सर्व फोटो- मुंबई इंडियन्स इन्स्टाग्राम)

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2टी-20 क्रिकेटरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App