Join us  

कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:35 PM

Open in App
1 / 9

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आघाडीवर आहेत.

2 / 9

मुंबई इंडियन्सने आयपीएलची ( 2013, 2015, 2017 आणि 2019) चार जेतेपद पटकावली आहेत, तर चेन्नई सुपर किग्सच्या नावावर (2010, 2011 आणि 2018) तीन जेतेपदं आहेत.

3 / 9

या दोन संघांचा मिळून एक संघ खेळवण्याचा विचार केला तर, कोणाला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल? मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना यांनी MI व CSK यांचा मिळून एक संघ तयार केला आहे.

4 / 9

ही संघ निवड करताना रोहित आणि रैना यांनी स्वतःला निवड समितीच्या भूमिकेत ठेवले. त्यामुळे या संघात या दोघांना स्थान मिळालेलं नाही.

5 / 9

या दोघांनी सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकर आणि मॅथ्यू हेडन यांची निवड केली, तर त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, किरॉन पोलार्ड आणि महेंद्रसिंग धोनी यांना निवडले.

6 / 9

अष्टपैलू म्हणून ड्वेन ब्राव्हो, हार्दिक पांड्या यांच्यासह रवींद्र जडेजानं संघात स्थान पटकावले आहे.

7 / 9

जसप्रीत बुमराह आणि हरभजन सिंग यांनी संघाच्या गोलंदाजाची फळी पूर्ण केली.

8 / 9

यावेळी रोहितनं मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली, तर रैनाकडे क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपद सोपवले.

9 / 9

असा आहे संघ - सचिन तेंडुलकर, मॅथ्यू हेडन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, किरॉन पोलार्ड, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, हरभजन सिंग

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्ससचिन तेंडुलकररोहित शर्मासुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीएफ ड्यु प्लेसीसड्वेन ब्राव्होहार्दिक पांड्याजसप्रित बुमराहरवींद्र जडेजाहरभजन सिंगअंबाती रायुडू