Cricket Buzz»फोटो गॅलरी »ICC World Cup 2019 : रोहितनं टोलावलेला षटकार 'तिला' लागला अन् हिटमॅननं दिलं सरप्राईजICC World Cup 2019 : रोहितनं टोलावलेला षटकार 'तिला' लागला अन् हिटमॅननं दिलं सरप्राईज By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 11:32 AMOpen in App1 / 8लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मानं मंगळवारी बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यानं 92 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकार खेचून 104 धावा चोपल्या.2 / 8रोहितचे हे यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथे शतक ठरले. त्याने यापूर्वी दक्षिण आफ्रिका ( 122*), पाकिस्तान ( 140) आणि इंग्लंड ( 102) यांच्याविरुद्ध शतकी खेळी केली होती.3 / 8 एकाच मैदानावर लागोपाठ तिसरे शतक करण्याची. बर्मिंगहमच्या एजबस्टन मैदानावर बांग्लादेशविरुध्दच्या त्याच्या आजच्या 104 धावा ही या मैदानावरची त्याची लागोपाठ तिसरी शतकी खेळी आहे. एजबस्टनवर अशी हॅट्रिक करणारा तो एकमेव आहे. 4 / 8या मैदानावर 2017 मध्ये त्याने बांगलादेशविरुध्द नाबाद 123 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता इंग्लंडविरुध्द 102 धावा केल्यावर पुन्हा बांगलादेशविरुध्दच त्याने 104 धावांची खेळी केली आहे. यासह त्याने एजबस्टनवरील शतकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. 5 / 8एका विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक शतकांचा विक्रम श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या नावावर आहे. 2015 साली झालेल्या विश्वचषकात संगकाराने चार शतके झळकावली होती. रोहितनेही या विश्वचषकात चार शतक झळकावत संगकाराशी बरोबरी केली आहे6 / 8या सामन्यात रोहितनं टोलावलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका महिलेला लागला. सामन्यानंतर रोहितनं त्या महिलेची विचारपूस केली आणि तिला ऑटोग्राफ केलेली टोपी भेट म्हणून दिली.7 / 88 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications