Join us  

Rohit Sharma: रोहितच्या धाडसाचं सर्वांनी केलं कौतुक; पत्नी रितिकाही भावूक, इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 11:54 AM

Open in App
1 / 7

बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली. त्याने तातडीने मैदान सोडलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठलं. काही वेळानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये परतला तो डाव्या बोटाला पट्टी बांधून... आता रोहित या सामन्यात काही खेळत नाही असे दिसत असताना रोहित ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् भारतीयांना धीर मिळाला.

2 / 7

तळाच्या फलंदाजांकडून फार साथ न मिळाल्याने रोहितचा संघर्ष अयशस्वी ठरला. रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, पण शेवटच्या चेंडूवरील फटका हुकला अन् ५ धावांनी बांगलादेशने हा सामना जिंकला. विजयासह बांगलादेशने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. २०१५नंतर त्यांनी पुन्हा वन-डे मालिका जिंकली.

3 / 7

भारताचे ६ फलंदाज १८९ धावांवर माघारी परतले होते आणि विजयासाठी त्यांना ११.४ षटकांत ८३ धावा करायच्या होत्या. दीपक चहर फलंदाजीला आला, सोबत शार्दूल ठाकूर होता. शार्दूल ७ धावांवर बाद झाला आणि भारताला विजयासाठी ४२ चेंडूंत ६४ धावा करायच्या होत्या. अशात रोहित मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बांगलादेशचे चाहते मात्र टेंशनमध्ये आले. बोट दुखत असूनही रोहितने ४६व्या षटकात इबादतला ६,६,४ असे धुतले.

4 / 7

रोहित जखमी असताना देखील मैदानावर उतरल्याने भारतीय संघातील खेळाडूंसह अनेकांनी त्याचे कौतुक केले. सोशल मीडियावर देखील रोहितचे धाडसाचे कौतुक केले जात आहे. रोहितची पत्नी रितीकाने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत रोहितचे कौतुक केले.

5 / 7

रोहित शर्माच्या या अप्रतिम खेळीवर त्याची पत्नी रितिका सजदेह हिने प्रतिक्रिया दिली. रितिकाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, I Love You, तू ज्या प्रकारची व्यक्ती आहेस त्याचा मला खूप अभिमान आहे. अशा परिस्थितीत मैदानात जाऊन अप्रतिम खेळी खेळणे खूप छान असल्याचं रितिकाने पोस्टद्वारे म्हटलं आहे.

6 / 7

दरम्यान, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची अवस्था दयनीय केली होती. अनामुल हक ( ११), लिटन दास ( ७), नजमूल शांतो ( २१), शाकिब अल हसन ( ८ ), मुश्फीकर रहिम ( १२) व आफिफ होसैन ( ०) हे सहा फलंदाज अवघ्या ६९ धावांवर माघारी परतले. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला स्लीपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले.

7 / 7

मेहिदी हसन मिराज याने पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवली आणि यावेळेस त्याला महमुदुल्लाहच्या अनुभवाची साथ मिळाली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावा जोडल्या. महमुदुल्लाह ९६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर तंबूत परतला. मेहिदी व नसून अहमद यांनी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मेहिदीने ८३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद १०० धावा केल्या. बांगलादेशने ७ बाद २७१ धावा केल्या.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेश
Open in App