जोडी तुझी माझी!! जहीर खान-सागरिका घाटगेचा ‘क्लासी ब्लॅक लूक’, तुम्ही पाहिलेत रोमँटिक Photos?

Zaheer Khan Sagarika Ghatge Romantic Photos : जहीर-सागरिका यांच्या लग्नाला ७ वर्ष झाली असून सोशल मीडियावर चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करतात.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू जहीर खान आणि त्याची पत्नी मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे या रोमँटिक जोडीची सध्या चर्चा आहे.

चक दे इंडिया चित्रपटापासून सागरिका चर्चेत आली. प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटातही ती झळकली. त्यानंतर २०१७ मध्ये जहीर सागरिका यांचे लग्न झाले.

सागरिका आणि जहीर हे अतिशय रोमँटिक कपल आहे. सोशल मीडियावरील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ कायमच चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.

सध्याही या जोडीचा एका इव्हेंटमधील 'क्लासी ब्लॅक' लूक व्हायरल चर्चेत आहे. या खास कार्यक्रमात जहीर-सागरिका दोघांनीही पूर्णपणे काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत.

जहीर खानने काळ्या रंगाचा थ्री-पीस सूट घातला असून त्याच्या ब्लेझरची लकाकी त्याचा लूक अधिकच खुलवत आहे. या सूटसोबत त्याने ब्लॅक फॉर्मल शूजसह लूक पूर्ण केला आहे.

सागरिकाही पूर्णपणे काळ्या रंगाच्या लाँग गाऊनमध्ये दिसत आहे. तिच्या ब्लॅक गाऊनवर असलेल्या छोटाशा डायमंड्सने तिचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे.

सागरिका आणि जहीर यांची लव्ह स्टोरी जितकी फिल्मी आहे, तितक्याच रोमँटिक पद्धतीने ते दोघे कायम एकमेकांसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसतात.

२०१४ साली सागरिका आणि जहीर पहिल्यांदा भेटले. हळूहळू गाठी भेटी वाढल्या आणि त्यांचे प्रेम जुळले. त्यानंतर तीन वर्षांनी २०१७ साली हे दोघे विवाहबद्ध झाले.

जहीर-सागरिका यांच्या लग्नाला आता सात वर्ष झाली असून हे पॉवर-कपल दोन्ही सेलिब्रिटींच्या फॅन्सना कायमच आवडते. त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर चाहते नेहमी लाइक्स-कमेंट्सचा पाऊस पाडतात.