Join us  

Rahul Tewatia आहे तरी कोण?; क्षणात Zeroचा Hero झाला, ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सनी नंतर डोक्यावर घेतले!

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 8:15 AM

Open in App
1 / 11

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामना रोमहर्षक झाला. KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच.

2 / 11

राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला. या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच संजू सॅमसन ( Sanju Samson) असला तरी चर्चा रंगली ती राहुल टेवाटियाची ( Rahul Tewatia).. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या राहुलवर सुरुवातीला नेटिझन्स खवळले, त्याला ट्रोल करू लागले. पण, त्याच्या मॅच विनिंग खेळीनं तो सर्वांच्या चर्चेचा विषय बनला. कोण आहे राहुल टेवाटिया?

3 / 11

मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी केली.

4 / 11

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला.

5 / 11

RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकात 30 धावा चोपल्या. राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला.जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.

6 / 11

कोण आहे राहुल टेवाटिया?

7 / 11

हरयाणाच्या या खेळाडूचा जन्म 20 मे 1993चा... 2013मध्ये त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या नावावर आतापर्यंत फक्त 7 सामने आहेत. हरयाणाकडून तो मर्यादित षटकांचे सामने अधिक खेळला आणि 91 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

8 / 11

2014 मध्ये त्याच्या IPL मधील कारकिर्दीला सुरुवात रॉयल्सकडूनच झाली. पण, त्याला केवळ तीनच सामने खेळण्याची संधी मिळाली. 2017मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि त्यांनीही त्याला तीन सामने खेळण्याची संधी दिली.

9 / 11

2018मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला 8 सामने खेळवले आणि 2019मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले.

10 / 11

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 50 सामन्यांत 154च्या स्ट्राईक रेटनं 691 धावा केल्या आहेत. नाबाद 59 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या नावावर 33 विकेट्सही आहेत.

11 / 11

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 7 सामन्यांत 190 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 21 सामन्यांत 484 धावा व 27 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स