Cricket Buzz»फोटो गॅलरी »पती-पत्नी दोघेही क्रिकेटर! पाच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी थाटला महिला खेळाडूसोबत संसारपती-पत्नी दोघेही क्रिकेटर! पाच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी थाटला महिला खेळाडूसोबत संसार By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 7:41 PMOpen in App1 / 7अलीकडेच भारतीय संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे. त्याने क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत सातफेरे घेतले. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलीवूड अभिनेत्रींना दीर्घकाळ डेट केले आहे. काहींनी त्यांच्याशी लग्न देखील केले आहेत. 2 / 7मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने काही दिवसांपूर्वीच देशांतर्गत महिला क्रिकेटरसोबत लग्न केले. जागतिक क्रिकेटमध्ये असे मोजकेच शिलेदार आहेत, ज्यांनी महिला खेळाडूसोबत संसार थाटला आहे. 3 / 7श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज गाई डिआल्विसने श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू रसांजली सिल्वासोबत लग्न केले. या दोघांनीही त्यांच्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळले आहे.4 / 7२०१४ मध्ये झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डोनाल्ड तिरिपानो सध्या संघातील अव्वल गोलंदाजांपैकी एक आहे. झिम्बाब्वे महिला संघाची माजी कर्णधार चिपो मुगेरी हिच्याशी तिरिपानोने लग्न केले आहे.5 / 7ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज ॲलिसा हिलीसोबत विवाहगाठ बांधली. सध्या हे दोघेही ऑस्ट्रेलियन संघात सक्रिय आहेत. 6 / 7१९६८ मध्ये इंग्लंडसाठी तीन कसोटी सामने खेळणाऱ्या रॉजर प्रिडॉक्स यांनी इंग्लिश महिला संघातील खेळाडू रुथ वेस्टब्रुकशी लग्न केले, ती स्वतः कसोटीपटू होती.7 / 7मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्न केले. ऋतुराज आणि उत्कर्षा दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आयपीएल २०२३ च्या फायनलनंतर दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आणखी वाचा Subscribe to Notifications