Cricket Buzz»फोटो गॅलरी »२०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज'२०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज' By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 5:16 PMOpen in App1 / 10चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल गाजवणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा आयपीएलमधील प्रवास खडतर राहिला आहे. 2 / 10ऋतुराजला २०१७ मध्ये रायजिंग सुपर जायंट्सने खरेदी केले. मात्र त्याला एक देखील सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तब्बल ३ वर्षे तो बाकावर बसला. 3 / 10आता ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामात त्याने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. याशिवाय सध्या ऑरेंज कॅप देखील मराठमोळ्या खेळाडूकडे आहे.4 / 10आयपीएल २०२३ मध्ये त्याने २ सामन्यांत १४९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. खरं तर सलामीच्या सामन्यात तो गुजरातविरूद्ध केवळ ८ धावांनी शतकाला मुकला होता. 5 / 10ऋतुराजला २०१७ मध्ये रायजिंग सुपर जायंट्सने खरेदी केले. पण तेव्हा त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी तब्बल ३ वर्षे वाट पाहिली.6 / 10तो २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा होता. पण २०२० मध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. 7 / 10ऋतुराज आजतागायत चेन्नईच्या संघाचा भाग आहे. चेन्नईच्या संघाने चौथ्यांदा आयपीएलचा किताब पटकावला त्या संघाचा तो भाग होता. आयपीएल २०२३ च्या लिलावापूर्वी सीएसकेने त्याला संघात कायम ठेवले होते.8 / 10ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३८ सामने खेळले असून १३५६ धावा केल्या आहेत. एक शतक आणि १२ अर्धशतकी खेळी करून ऋतुराजने भारतीय संघापर्यंत मजल मारली. 9 / 10याशिवाय त्याच्या नावावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो. याशिवाय त्याने इंडिया ए, इंडिया बी आणि इंडिया ब्लू साठीही क्रिकेट खेळले आहे.10 / 10ऋतुराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एक वन डे आणि ९ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications