Join us  

वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ते वेगवान शतक; दक्षिण आफ्रिकेचा विक्रमांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 6:35 PM

Open in App
1 / 6

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी वैयक्तिक शतक झळकावताना विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर एडन मार्करमने चौकार-षटकारांची आतषबाजी करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान शतक नोंदवले. शिवाय दक्षिण आफ्रिकेनेही वर्ल्ड कप स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली.

2 / 6

रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक या जोडीने १७४ चेंडूंत २०४ धावांची भागीदारी केली. क्विंटन ८४ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०० धावांवर झेलबाद झाला. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेकडून शतक झळकावणारा क्विंटन हा दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. २०११ला एबी डिव्हिलियर्सने नेदरलँड्सिरुद्ध १३४ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०७ धावा केल्या होत्या.

3 / 6

डेर ड्युसेन ११० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांवर बाद झाला. एडन मार्करमने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे वेगवान शतक ठरले. मार्करमने यापूर्वी नेदरलँड्सविरुद्ध ३७ चेंडूंत शतक झळकावले होते. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला.

4 / 6

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील जलद शतकाचा विक्रम आज मार्करमच्या नावावर नोंदवला गेला, त्याने ४९ चेंडूंत हा पराक्रम करताना २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध केव्हीन ओ'ब्रायन ( आयर्लंड) याचा ५० चेंडूतील शतकाचा विक्रम मोडला. ग्लेन मॅक्सवेलने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत शतक झळकावले होते.

5 / 6

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकाच सामन्यात तीन शतकवीर होण्याची ही पहिलीच घटना आहे. वन डे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक ३ वेळा ४००+ धावा केल्या आहेत आणि वन डेत त्यांच्या नावावर ८ वेळा हा पराक्रम आहे.

6 / 6

दक्षिण आफ्रिकेने आज ५ बाद ४१९ धावा चोपल्या आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा केल्या होत्या. त्याआधी भारताने २००७मध्ये बर्म्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा केल्या होत्या.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपद. आफ्रिकाश्रीलंका