Join us  

Sachin Tendulkar Birthday: मोडणं अशक्य आहे सचिनचे हे पाच रेकॉर्ड्स, रोहित-विराट त्याच्या आसपासही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 12:50 PM

Open in App
1 / 6

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४९ वर्षांचा झाला आहे. फलंदाजीमधील क्वचितच अशी काही रेकॉर्ड्स आहेत जी सचिनच्या नावे झालेली नाहीत. त्याचे काही विक्रम आताच्या जमान्यातील क्रिकेटपटूंनी मोडले आहेत. मात्र सचिनने क्रिकेटमध्ये काही असे रेकॉर्ड्स प्रस्थापित करून ठेवले जे मोडणे जवळपास अशक्य आहे. पाहुयात कोणते आहेत ते रेकॉर्ड्स

2 / 6

सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेटच्या कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन प्रकारांमध्ये सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम आहे. कसोटीमध्ये सचिनने १५ हजार ९२१ धावा काढल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८ हजार ४२६ धावा आहेत. क्रिकेटमधील कुठलाही फलंदाज हा सचिनच्या आसपाससुद्धा नाही आहे.

3 / 6

एकवेळ विराट कोहली हा ज्या वेगाने धावा फटकावत होता, त्यावरून तो सहजपणे विराट सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांच्या विक्रमाला गवसणी घालेल असे वाटत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या शतकांची गाडी ही ७० शतकांवर अडकली आहे. त्यामुळे १०० शतकांचा विक्रम हा मोडणे अवघड दिसत आहे.

4 / 6

सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आहे. सचिनने २२ वर्षांपर्यंत क्रिकेट खेळले असून, त्याने ४४५ एकदिवसीय आणि २०० कसोटी सामने खेळले आहेत. त्याचा हा विक्रमही अबाधित राहण्याची शक्यता आहे. ट

5 / 6

सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत २०५८ चौकार आणि ६९ षटकार ठोकले आहेत.

6 / 6

तसेच सचिन तेंडुलकरच्या नावावर अजून एक अनोखा रेकॉर्ड आहे. सचिनने क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विश्वचषक खेळले आहेत. सचिनने एकूण ६ विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. सचिन १९९२ ते २०११ अशा सलग सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला होता.

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App