Join us  

Sachin Tendulkar Birthday: सचिन तेंडुलकरचे क्रिकेटच्या मैदानातील हे मोठे विक्रम, तुटणं कठीणच नाही तर अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:15 AM

Open in App
1 / 10

आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर सुमारे २५ वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज आपल्या जीवनाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात सचिनने क्रिटेकच्या मैदानात रचलेल्या काही विक्रमांविषयी. जे आजच्या काळाात तुटणं कठीणच नाही तर अशक्य आहे.

2 / 10

वयाच्या १५व्या वर्षी सचिन तेंडुलकरने रणजी करंडक स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पहिलं शकत ठोकलं होतं. त्यावेळी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सचिन हा भारताचा सर्वात युवा फलंदाज ठरला होता.

3 / 10

वयाची २० वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके ठोकली होती. हा एक विक्रम आहे.

4 / 10

आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी मानाची असलेली ऑरेंज कॅप पटकावणारा सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्याने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना १५ सामन्यांत ६१८ धावा फटकावल्या होत्या.

5 / 10

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नव्वदीमध्ये बाद होण्याची नामुष्कीही सचिनवर ओढवली होती. सचिन वनडेमध्ये १८ वेळा आणि कसोटीमध्ये १० वेळा नव्वदीमध्ये बाद झाला होता.

6 / 10

क्रिकेटमधून निवृत्तीपूर्वी राज्यसभेचं नामांकित सदस्यत्व मिळालेला सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. तसेच राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला सचिन हा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.

7 / 10

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २६४ वेळा ५० हून अधिक धावा काढण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४५ तर कसोटीमध्ये ११९ वेळा ५० हून अधिक धावा काढल्या आहेत. याबाबतीत कुठलाही फलंदाज त्याच्या आसपासही नाही आहे.

8 / 10

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४,३५७ धावा फटकावल्या आहेत. त्यामध्ये कसोटीमधील १५ हजार ९२१ आणि एकदिवसीय क्रिकेटमधील १८ हजार ४२६ धावांचा समावेश आहे.

9 / 10

सर्वाधिक ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यामध्ये २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्याचा समावेश आहे.

10 / 10

सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ वेळा मालिकावीर आणि ६२ वेळा सामनावीराचा मान पटकावला होता. हा एक विक्रम आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनने पटकावला होता.

टॅग्स :सचिन तेंडुलकरआंतरराष्ट्रीय क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ
Open in App