Join us

सचिन तेंडुलकरची काश्मीरच्या बर्फात धमाल-मस्ती; सोबत लेक सारा अन् पत्नी अंजलीची 'कंपनी' (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 13:09 IST

Open in App
1 / 5

महान फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या काश्मीरमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसतोय. सचिनची लाडकी लेक सारा आणि पत्नी अंजली या दोघीही त्याच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.

2 / 5

काश्मीरमध्ये लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतानाचा सचिनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सचिनने त्याच्या ट्रिपचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5

सचिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून काही निवडक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तो पहलगाम भागातील पहिली बर्फवृष्टी अनुभवत असल्याचे त्याने लिहिले आहे.

4 / 5

सचिन, त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तिघांनीही छान पोज देत आणि स्मितहास्य करत फोटो क्लिक केले आहेत.

5 / 5

शेवटच्या फोटोत सचिनसोबत एक बकरी / मेंढी दिसत आहे. या फोटोवरून बरेच लोक कमेंट करत आहेत. सचिनला GOAT म्हणजेच 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' म्हटले जाते. त्यामुळे एका फोटोत दोन GOAT कसे काय, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरसारा तेंडुलकरजम्मू-काश्मीरबर्फवृष्टी