Join us  

सचिनपासून ते शाहिद आफ्रिदीपर्यंत... 'या' खेळाडूंनी २० वर्षांपेक्षा जास्त काळ गाजवलं क्रिकेटचं मैदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 7:01 PM

Open in App
1 / 7

क्रिकेट हा फिटनेसचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये मोठी कारकीर्द घडवायची असेल तर त्यासाठी खेळाडूने फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. नुकतंच भारताचा हरभजन सिंग याने २३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानिमित्ताने पाहूयात २० वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेटचं मैदान गाजवलेले खेळाडू...

2 / 7

फ्रँक वूली (Frank Woolley) - फ्रँक एडवर्ड वूली हे एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. त्यांनी २० वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवलं. इंग्लंडकडून खेळताना त्यांनी ६४ सामन्यात ३६ च्या सरासरीने ३ हजार २८३ धावा केल्या आणि ८७ बळीदेखील घेतले.

3 / 7

शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) - या यादीत आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी. आफ्रिदीने २२ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ५१८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात त्याने २३.५७च्या सरासरीने ११ हजार १९६ धावा कुटल्या.

4 / 7

जॉर्ज गन (George Gunn) - नॉटिंघमशायरकडून खेळणारे सलामीवीर जॉर्ज गन यांची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्यांची कारकिर्द २३ वर्षांची होती. पण त्या कालावधीत त्यांनी केवळ १५ कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ४० च्या सरासरीने १ हजार १२० धावा केल्या. परंतु, स्पर्धात्मक क्रिकेटचा विचार करता त्यांनी एकूण ६४३ सामने खेळले.

5 / 7

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) - मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने तब्बल २४ वर्षे धडाकेबाज क्रिकेट खेळलं. त्याने आपल्या समृद्ध अशा कारकिर्दीत ४६३ एकदिवसीय सामने खेळून १८ हजार ४२६ धावा केल्या. तसंच २०० कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १५ हजार ९२१ धावांचा टप्पा गाठला.

6 / 7

ख्रिस गेल (Chris Gayle) - विंडिजचा युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल या यादीत समाविष्ट आहे. गेल गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळ क्रिकेटचं मैदान गाजवतोय. त्याने अद्याप निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तरीही त्याच्या नावे २४ हजारांहून अधिक धावा आहेत.

7 / 7

हरभजन सिंग (Harbhajan Singh) - भज्जीनेदेखील १९९८ पासून क्रिकेट खेळायला सुरूवात करून २३ वर्षांनी निवृत्ती स्वीकारली. पण २०१६पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. IPL 2021च्या हंगामातदेखील त्याला केवळ ३ सामनेच खेळता आले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरशाहिद अफ्रिदीहरभजन सिंगख्रिस गेल
Open in App