Cricket Buzz»फोटो गॅलरी »वर्ल्ड कपमध्ये कोणी रचलंय धावांचं सर्वोच्च शिखर?वर्ल्ड कपमध्ये कोणी रचलंय धावांचं सर्वोच्च शिखर? By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:32 PMOpen in App1 / 10ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अॅडम गिलख्रिस्टने 1999 ते 2007 या कालावधीत झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये 31 सामन्यांत 1085 धावा केल्या आहेत. 149 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या नावावर 1 शतक व 8 अर्धशतक आहेत.2 / 10श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने या क्रमवारीत नवव्या स्थानावर येतो. त्याने 1999 ते 2015 पर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेतील 34 डावांत 1100 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 4 शतकं व 5 अर्धशतकं आहेत.3 / 10श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशान हा आठव्या स्थानावर असून त्याने 25 डावांत 1112 धावा केल्या आहेत. 161 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे आणि त्याच्या नावावर 4 शतकं व 4 अर्धशतकं आहेत.4 / 10दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज जॅक कॅलिस यानेही 1996 ते 2011 दरम्यान 32 डावांत 1148 धावा चोपल्या आहेत. पण, त्याला केवळ एकच शतकं झळकावता आलं, तर 9 अर्धशतकी खेळी केल्या.5 / 10श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने सहाव्या स्थान काबीज केले आहे. त्याने 37 डावांत 1165 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली.6 / 10दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स टॉप फाईव्हमध्ये येतो. त्याने 22 डावांत 1207 धावा चोपल्या आहेत आणि 162 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने चार शतकं व 6 अर्धशतकं केली आहेत.7 / 10वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 33 डावांत 1225 धावा आहेत. त्यात दोन शतकं व 7 अर्धशतकांचा समावेश आहे.8 / 10 श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 2003 ते 2015 या कालावधीत चार वर्ल्ड कप स्पर्धा खेळला. त्यात त्याने 35 डावांत 1532 धावा केल्या. त्याच्या नावावर 5 शतकं व 7 अर्धशतकं आहेत.9 / 10ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 42 डावांत 1743 धावा केल्या. त्यात 5 शतकं व 6 अर्धशतकं आहेत. 10 / 10भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर या क्रमवारीत टॉपवर आहे. त्याने सहा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये 44 डावांत 2278 धावा चोपल्या आहेत. त्यात त्याच्या नावावर 6 शतकं व 15 अर्धशतकं आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications