Join us

आजच्याच दिवशी सचिन ठरला होता द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 16:40 IST

Open in App
1 / 5

आज २४ फेब्रुवारी... २०१० मध्ये याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला होता. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका वीराने द्विशतक झळकावण्याचा 'न भूतो' पराक्रम केला होता. तो विश्वविक्रमवीर होता, अर्थातच आपला लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.

2 / 5

2010 मध्ये आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय सामन्यात 200 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. ग्वालिअरमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात सचिन 200 धावांवर नाबाद राहिला होता.

3 / 5

या द्विशतकासोबत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला होता.

4 / 5

200 धावा करुन नाबाद खेळी करणा-या सचिनने 147 चेंडूंचा सामना केला होता. त्याने 200 धावांच्या खेळीत 25 चौकार आणि तीन षटकार लगावले होते.

5 / 5

ग्वालिअरमधील कॅप्टन रुपसिंह स्टेडिअममध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात सचिनने 200 धावांची जबरदस्त खेळी केली होती. सचिनने केलेल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने तीन विकेट गमावत 401 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका संघ मात्र 43 ओव्हर्समध्येच 248 धावा करुन ऑल आऊट झाला होता. भारताने हा सामना 153 धावांनी जिंकला होता.

टॅग्स :सचिन तेंडूलकर