महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते आणि तिच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अपडेट्सबाबत नेटकरी उत्सुक असतात.
साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 साली झाला. साराने लंडनच्या विद्यापीठातून डीग्री घेतली आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत साराची एन्ट्री झालेली नाही. पण बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपेक्षा तिचे ग्लॅमर कमी नाही
सारा आणि भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल यांच्या प्रेमाच्याही चर्चा सोशल मीडियावर रंगवल्या गेल्या. त्याला काही योगायोगही कारणीभूत ठरले.
पण, सारानं नुकताच तिच्या सोशल अकाऊंटवर Date Night चा फोटो टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सारा नेमकी कोणासोबत Date वर गेलीय याची सर्वांना उत्सुकता लागली होती.
तिच्या या पोस्टवर नेटकरी तुटून पडले होते, पण सारा कोणा मुलासोबत नाही, तर तिच्या जवळची मैत्रीण कनिका कपूर हिच्यासोबत फिरायला गेली होती आणि तिनं Date Night असी कॅप्शन देऊन नेटकऱ्यांची फिरकी घेतली.