माय लेकीची धमाल! सारा तेंडुलकरनं शेअर केली वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक, Photos

सारा तेंडुलकरने अलीकडेच तिचा २७वा वाढदिवस साजरा केला.

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने २८व्या वर्षात पदार्पण केले. साराने १२ ऑक्टोबर २०२४ रोजी तिचा २७वा वाढदिवस साजरा केला.

२७व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक शेअर करत साराने सर्वांचे लक्ष वेधले. साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई अंजली तेंडुलकर देखील दिसत आहे.

सारा दिसायला खूपच सुंदर असून ती काही जाहिरातींमध्ये झळकली आहे. ती अनेक ब्रँड्सची ॲम्बेसिडरही आहे.

"२७ वा हंगाम आणि त्यातील एक भाग", अशा आशयाचे कॅप्शन तिने या वाढदिवसानिमित्त लिहिले.

सारा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.

तसेच बॉलिवूडमध्ये स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसते. त्यामुळे सिनेमा न करताही साराची बीटाऊनमध्ये चर्चा असते.

केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते आणि अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.