T20 World Cup 2021: सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या संघासोबत साजरा केला मुलाचा बर्थडे; फोटो झाले व्हायरल!

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आपला पती शोएब मलिक याच्यासोबत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या बायो बबलमध्ये आहे.

आताच्या घडीला पाकिस्तानचा संघ (Pakistan Cricket Team) दमदार कामगिरी करत असून, जागतिक टी-२० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2021) सलग विजय नोंदवत विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारीत स्थान बळकट केल्याचे सांगितले जात आहे.

जागतिक टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आपला पती शोएब मलिक (sania mirza and shoeb malik) याच्यासोबत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या बायो बबलमध्ये आहे.

शोएब आणि सानियाने मुलगा इझान मिर्झा मलिकचा (izhaan mirza malik) तिसरा वाढदिवस पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत साजरा केला. यावेळी सानिया मिर्झाने आपल्या मुलाला उद्देशून एक खास संदेशही लिहिला आहे.

सानियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलाच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच माझ्या माझ्या संपूर्ण जगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तीन वर्षांपूर्वी या दिवशी मी तुझी आई म्हणून पुनर्जन्म घेतला.

मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आम्हाला पालक म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट सानिया मिर्झाने या फोटोसोबत लिहिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही इझानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सानिया आणि शोएबचा मुलगा इझान याच्या वाढदिवसाच्या पार्टीला पाकिस्तान संघातील खेळाडूंनीही उपस्थिती लावली होती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि त्याची पत्नीही या पार्टीत सहभागी झाले होते.

याशिवाय पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीज आणि त्याच्या पत्नीने या पार्टीत सहभागी होत इझानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पाकिस्तान संघाचा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास अतिशय नेत्रदीपक ठरला आहे, त्यांनी तिन्ही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण संघात आनंदाचे वातावरण आहे.

जागतिक टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताचा दारुण पराभव केल्यानंतर पाकिस्तानी संघाचा आत्मविश्वास दुपटीने वाढला होता. पाकिस्तानने न्यूझीलंड संघाविरुद्ध विजय मिळवला आणि यानंतर अफगाणिस्तान संघालाही नमवत विजयाची हॅटट्रिक केली.

शोएब मलिकला भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, त्याची या सामन्यातील भूमिका महत्त्वाची होती, असे सांगितले जाते. तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शोएबने अनुभव दाखवत २६ धावांची नाबाद खेळी केली. ही अतिशय महत्त्वाची होती. तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शोएबने १९ धावा केल्या.

Read in English