Join us  

सानिया मिर्झाच्या पतीवर कोरोनाचं संकट! आज येईल रिपोर्ट; ...तरच मिटेल 'लंबी जुदाई'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 3:43 PM

Open in App
1 / 9

पाकिस्तान क्रिकेट संघ मोठ्या उत्साहाने इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता. हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. कारण, अगदी कोरोना व्हायरस जागतिक महामारीच्या काळातच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

2 / 9

खरेतर, मंगळवारी एक बातमी आली आणि या बातमीने संपूर्ण पाकिस्तानसह, कोट्यवधी क्रिकेट प्रेमींनाच झटका दिला. ही बातमी होती, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या 3 खेळाडूंना कोरोना संसर्ग झाल्याची.

3 / 9

पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खान, वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि फलंदाज हैदर अली या तीन पाकिस्तानी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. रावळपिंडी येथे यांची कोरोना टेस्ट झाली होती. त्यात ते पॉझिटिव्ह अल्याचे निदर्शनास आले.

4 / 9

कोरोनाची लागण झाल्याने या तीनही खेळाडूंच्या इंग्लंड दैऱ्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता यांचे इंग्लंड दौऱ्यावर जाणे कठीन आहे.

5 / 9

पाकिस्तानच्या इतर खेळाडूंनाही कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो. आज मंगळवारी सर्वांच्याच नजरा सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तान संघाचा ऑलराउंडर असलेल्या शोएब मलिकवर असणार आहेत.

6 / 9

शोएब मलीक याचीही कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. याचा रिपोर्ट मंगळवारी म्हणजेच आज सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.

7 / 9

लॉकडाउन काळात सानिया मिर्झा हैदराबादमध्ये अडकली आहे. तर शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, शोएब इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी सानिया मिर्झाला भेटण्यासाठी भारतात येणार आहे. मात्र, आता त्याचे भारतात येणे आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणेही, आज येणाऱ्या कोरोना रिपोर्टवरच अवलंबून आहे.

8 / 9

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांची गेल्या पाच महिन्यांपासून भेट झालेली नाही.

9 / 9

पाकिस्तान संघ 28 जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना या दौऱ्यावर नेता येणार नाही. पण, इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी शोएबला त्याच्या कुटुंबाला म्हणजेच सानिया आणि मुलाग इजहानला भेटण्याची परवानगी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आणि इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळाने दिली आहे. त्यामुळे तो 24 जुलैला इंग्लंडला पोहोचेल.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकपाकिस्तानटेनिस