Join us

PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:18 IST

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा चेहरा म्हणजे जसप्रीत बुमराह.

2 / 10

भल्या भल्या फलंदाजांना चीतपट करणाऱ्या बुमराहने विश्वचषक गाजवला. अंतिम सामन्याच देखील त्याने शानदार कामगिरी करताना सामना भारताच्या बाजूने फिरवला.

3 / 10

मार्को यान्सेनचा उडलेला त्रिफळा यंदाच्या विश्वचषकातील सर्वोत्तम चेंडूपैकी एक चेंडू ठरला. बुमराहची पत्नी संजना गणेसनही या स्पर्धेची भाग होती. ती स्टार स्पोर्ट्ससाठी प्रेझेंटेटर म्हणून कार्यरत होती.

4 / 10

संजनाने बुमराहची घेतलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरली. ६ मे १९९१ रोजी जन्मलेली संजना गणेसन ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. ती मॉडलिंग देखील करायची. ती अनेकदा भारतातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समालोचन करताना दिसते.

5 / 10

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती.

6 / 10

असे बोलले जाते की या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली, परंतु त्यानंतर बराच वेळ त्यांच्यात बोलणे झाले नाही. संजना आणि जसप्रीतची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. या दोघांनी बरेच दिवस आपले नाते मीडियापासून दूर ठेवले होते.

7 / 10

२०२१ मध्ये जेव्हा जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली होती.

8 / 10

लग्नानंतर दोघांनी एकत्र फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली. लग्नाआधी जसप्रीत आणि संजना दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले.

9 / 10

संजना आणि जसप्रीत यांना एक मुलगा असून त्याचे नाव अंगद असे आहे. आता संजनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंगद देखील दिसत आहे.

10 / 10

टॅग्स :संजना गणेशनजसप्रित बुमराहसेलिब्रिटी