Sara Tendulkar Net Worth : सचिनची 'लेक' कोट्यवधीची मालकीण; जाणून घ्या 'सारा' कमाईचा स्त्रोत

Sara Tendulkar Earning : साराने २०२१ मध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर तिची वेगळी ओळख निर्माण केली.

भारतीय क्रिकेट संघाचा चेहरा, दिग्गज, मास्टर ब्लास्टर आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.

केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते. तिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ६.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

ती नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. सारा तेंडुलकरचा जन्म क्रिकेटचा दिग्गज सचिनच्या घरात झाला. यामुळे तिला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला फार वेळ लागला नाही.

खेळावरील आवडीसह तिने तिच्या वैयक्तिक आवडींचा समतोल साधला आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पर्यंत सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती ५० लाख ते १ कोटी रुपये होती.

सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते आणि अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.

सारा तेंडुलकर उच्चशिक्षित आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.

साराने २०२१ मध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर तिची वेगळी ओळख निर्माण केली.

२०२१ मध्ये तिने प्रतिष्ठित ब्रँड सेल्फ-पोर्टेटसाठी एका कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन मॉडलिंग क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.

काही दिवसांपूर्वीच साराने प्रसिद्ध कोरियन स्कीन केअर ब्रँड लानेजची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले.