सारा तेंडुलकर ही लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar ) लेकीनं सोशल मीडियावर आपला एक वेगळा चाहतावर्ग कमावला आहे.
वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट असणारा हा चेहरा पुन्हा एकदा मॅचमुळे चर्चेत आला आहे. यावेळी सारा तेंडुलकर चर्चेत येण्यामागचे कारण खूपच वेगळे आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन येथील गाबा मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी ती चक्क स्टेडियमवर पोहचल्याचे स्पॉट झाले. जहीर खानची पत्नी अभिनेत्री सागरिका घाडगे हिच्यासोबत ती दिसली.
ती स्टेडियमवर दिसली याची चर्चा होणार नाही, असे कसे होईल. पहिल्या दिवसाचा पावसामुळे फार काळ रंगला नाही, पण साराची एक झलक दिसली अन् तिची चर्चा सोशल मीडियावर रंगली.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सारा तेंडुलकर स्टेडियमवर स्टँडमध्ये उपस्थितीत राहिल्याचे पाहायला मिळाले. ब्लू आउटफिट मध्ये तिची खास झलक दिसली.
सारा तिच्या काही मित्र-मैत्रिणींसोबत स्टेडियममध्ये आली होती. सोशल मीडियावर तिच्यासंदर्भात तुफान चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मॅचपेक्षा ब्रिस्बेनमध्ये पाऊस, वारा अन् तेंडुलकरांची सारा हाच विषय चर्चेचा ठरला.
स्टेडियममधील स्टँडमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेतानाचे सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच तिनेही आपल्या फ्रेंड्स गँग सोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
सारा तेंडुलकर स्टेडियममध्ये आपल्या हॉट & फिट लूकमध्ये दिसली. त्यामुळे तिच्या खास हजेरीची चर्चा रंगली. त्यासोबतच सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill ) याच्या नावाचीही ओघाओघाने चर्चा रंगल्याचे दिसले.