सारा तेंडुलकरचं ऑस्ट्रेलियन बेटावर भलतंच बोल्ड फोटोशूट, कर्व्ही फिगरवर खिळल्या नजरा

Sara Tendulkar Bold Photos on Australian Beach Lizard Island : साराने केलेल्या फोटोशूटमध्ये आजुबाजूला अथांग समुद्र दिसतोय, तर काही फोटोत बाजुला घनदाट वनराई दिसतेय.

सचिन तेंडुलकर ची लेक सारा सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ती मॉडेलिंग क्षेत्रात अँक्टिव्ह असते.

काही दिवसांपूर्वी गाबा स्टेडियममध्ये हजेरी लावणाऱ्या साराने आता समुद्रकिनारी क्लिक केलेले काही बोल्ड फोटो पोस्ट केलेत.

सारा ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड प्रांतात भटकंती करत आहे. याचदरम्यान तिने लिझार्ड आइसलँड येथे खास फोटोशूट केलंय.

साराने हा खास फोटोशूट करताना हिरव्या रंगाचा ट्रान्सपरंट वन पीस ड्रेस घातला आहे. डीपनेक ड्रेसवर तिने मॅचिंग ज्वेलरीदेखील घातलीय.

साराने केलेल्या फोटोशूटमध्ये आजुबाजूला अथांग असा समुद्र दिसतोय. तर काही फोटोत बाजुला घनदाट वनराई दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागासाठी तिने हा फोटोशूट केला असल्याचे तिने सोशल मिडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

आपल्या ताज्या फोटोशूटमध्ये साराने भलत्याच हॉट पोज दिल्या असून तिच्या नव्या लूकला चाहतेही पसंतीची पावती देताना दिसत आहेत.

साराने आपल्या बोल्ड फोटोशूटमधून आपली कर्व्ही फिगरदेखील फ्लाँट केली आहे. (सर्व फोटो - Sara Tendulkar Instagram)

साराने लिजार्ड आइसलँडवरील फोटोशूट दरम्यान नितळ निळ्याशार समुद्रात पोहोचण्याचाही आनंद लुटला.