IPL vs PSL : आयपीएलच्या एका षटका इतकीही पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्याची किंमत नाही!

IPL vs PSL per match media rights value : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2023 ते 2027 या कालावधीचे मीडिया राईट्स 48,390 कोटींना विकले गेले आहेत.

IPL vs PSL per match media rights value : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2023 ते 2027 या कालावधीचे मीडिया राईट्स 48,390 कोटींना विकले गेले आहेत. स्टार स्पोर्ट्सने 23,575 कोटी मोजून पाच वर्षांसाठी टीव्ही प्रसारणाचे हक्क स्वतःकडे कायम राखले, तर डिजिटलसाठी रिलायन्सच्या Viacom ने 20,500 कोटी मोजले.

Viacom ने पॅकेज सी व डी यातही गुंतवणूक केली आहे. बीसीसीआयला मिळालेल्या या कुबेराच्या खजन्यामुळे आयपीएलमधील आता एका चेंडूची किंमत 49 लाख झाली आहे, तर एक षटक 2.95 कोटींचे असणार आहे. 2023पासून प्रत्येक आयपीएल सामन्यातून BCCI 118 कोटींची कमाई करणार आहे.

2018 साली स्टार इंडियाने मिळवलेल्या पाच वर्षांसाठीच्या हक्कांनुसार एका सामन्यासाठीची किंमत 60 कोटी होती. वायकॉमने पॅकेज सी जिंकून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड क्षेत्रातील हक्क खरेदी केले, तर टाईम्स इंटरनेटला अमेरिकेतील प्रक्षेपणाचे राईट्स मिळाले आहेत.

आयपीएल २०२२ ची बक्षीस रक्कम - विजेता संघ - २० कोटी, उपविजेता - १३ कोटी, तिसरा क्रमांक - ७ कोटी, चौथा क्रमांक - ६.५ कोटी अन् महिला ट्वेंटी-२० लीग जिंकणाऱ्या सुपरनोव्हाज संघाला BCCI ने २५ लाखांचा धनादेश दिला.

आयपीएलच्या एका सामन्याला ११८ कोटी मिळतात... याची तुलना पाकिस्तान सुपर लीगला मिळणाऱ्या एका सामन्याच्या किमतीशी केली, तर आयपीएल कैक पटीने कमावतो. PSLच्या एका सामन्याला २.७६ कोटी रुपये मिळतात.

पाकिस्तान सुपर लीगच्या एका पर्वात ७.५ कोटी ( भारतीय चलन) रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. त्यापैकी विजेत्या संघाला ३.७२ कोटी, तर उपविजेत्याला १.५ कोटी दिले गेले आहेत. ३.३५ लाख रुपयांचे ३४ खेळाडूंमध्ये समान वाटप केले जाते. सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आदी पुरस्कारांसाठी एकूण ६० लाख रुपये दिले जातात. उर्वरित रक्कम सर्वोत्तम कॅच, बेस्ट रन आऊट व सर्वाधिक षटकार आदी पुरस्कारांसाठी असेल.