लॉर्ड्स कसोटीचा पाचव्या दिवसाचे पहिले सत्र जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी गाजवले. गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत या दोघांनी कमाल करताना इंग्लंडला अक्षरशः रडकुंडीला आणले. या दोघांनी ९व्या विकेटसाठी नाबाद ७७ धावांची भागीदारी करताना लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाला ८ बाद २८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारतानं २५९ धावांची आघाडी घेत, सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. जस्सी व शमीच्या फटकेबाजीनंतर फॅन्सना युवराज सिंग व अँड्य्रू फ्लिंटॉफ यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २००७मधील प्रसंग आठवला, तर अनेकांना राहुल द्रविड व व्ही व्ही एस लक्ष्मण यांची ऐतिहासिक भागीदारी आठवली.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:59 PM2021-08-16T17:59:32+5:302021-08-16T18:00:53+5:30