सेल्फी टाईम...

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेले इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जस्प्रीत बुमरा हे तीन जलदगती गोलंदाज सोमवारी रवाना झाले. त्यावेळी विमानतळावर त्यांनी सेल्फी काढला.

भारताच्या कसोटी संघातील मधल्याफळीतील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा यालाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यानेही रवींद्र जडेजा, बुमरा, आर अश्विन, शर्मा व शमी यांच्यासोबत सेल्फी काढला.

बॉलिवूड आणि क्रिकेट हे घट्ट नाते आहे. त्याची प्रचिती पुन्हा आली. जलदगती गोलंदाज बुमराला बॉलिवूडमधील वरिष्ठ अभिनेते परेश रावल यांच्यासोबत सेल्फी घ्यावासा वाटला.

कसोटी संघातून वगळलेला सलामीचा फलंदाज रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेहसोबत चेक प्रजासत्ताक येथे सुट्टीसाठी गेला आहे. त्याने इंस्टाग्रामवर रितिकासोबतचा सेल्फी टाकला आहे.