खतरनाक! रिषभ पंतची रूमर्ड गर्लफ्रेंड इशा नेगीचा कमालीचा फिटनेस! Photos वर चाहते फिदा

Rishabh Pant Girlfriend Isha Negi Fitness Photos: रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात इशा नेगीने हजेरी लावली, त्यावेळी बरेच लोकांनी रिषभ-इशा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले होते.

भारतीय संघाचा विकेटकिपर रिषभ पंत सध्या IPL मध्ये खेळतोय, तर दुसरीकडे त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड इशा नेगी इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.

रिषभ पंत किंवा इशा नेगी दोघांपैकी कुणीही आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपची किंवा प्रेमप्रकरणाची जाहीरपणे कबुली दिलेली नाही.

रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात इशा नेगीने हजेरी लावली, त्यावेळी बरेच लोकांनी रिषभ-इशा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले होते.

सध्या रिषभची रूमर्ड गर्लफ्रेंड इशा नेगी ही त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...

इशा नेगीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या फोटोतून तिचा कमालीचा फिटनेस दिसतोय.

इशाचे वजन सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी होते, त्यामुळे तिला वजन वाढवण्याची गरज होती, त्यानुसार आता तिने फिटनेसकडे लक्ष दिले आहे.

इशाने पोस्ट केलेले सर्व फोटो हे मिरर सेल्फी आहेत. त्यात तिने तिचे सिक्सपॅक अँब्स दाखवले असून हे फोटो इंटरनेटवर क्षणातच व्हायरल झालेत.

इशाच्या या फोटोंवरून अनेकांनी रिषभ पंतबाबतही मजेदार कमेंट केल्या आहेत. तर काहींनी इशा नेगीचा अभिनेत्री होण्याचा प्लॅन आहे का, असेही विचारलेय.

इशा नेगी ही पेशाने इंटेरियर डिजायनर आहे. ती स्वत: एक यशस्वी लघुउद्योजिका आहे. त्याचप्रमाणे फॅशन वर्ल्डशी कनेक्टेड असल्याने ती मॉडेलिंगही करते.