Join us  

Team India, T20 World Cup 2022: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे 'हा' खेळाडू पुढील सामन्याला मुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 3:28 PM

Open in App
1 / 6

Team India: टीम इंडियाला T20 World Cup 2022 मध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारतीय फलंदाजांची बाऊन्सर चेंडूंवर अक्षरश: तारांबळ उडाली. दक्षिण आफ्रिकेच्या प्लॅनमध्ये भारतीय फलंदाज अडकले. केवळ सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम राखत ४० चेंडूत ६८ धावा केल्या. भारताने कशीबशी १३४ धावांपर्यंत मजल मारली.

2 / 6

दक्षिण आफ्रिकेसारख्या संघासमोर एवढ्या कमी आव्हानाचा बचाव करणे भारतीय गोलंदाजांना शक्य झाले नाही. सुरूवातीला वेगवान गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणली. पण नंतर डेव्हिड मिलरच्या नाबाद ५९ धावा आणि एडन मार्करमच्या ५२ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने २ चेंडू राखून शेवटच्या षटकात सामना जिंकला.

3 / 6

भारताला या पराभवाचा फारसा फरक पडणार नसला, तरी आता पुढील सर्व सामने जिंकून विजयी लय कायम राखण्याचे आव्हान टीम इंडियापुढे असणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा स्टार खेळाडूच दुखापतग्रस्त झाला असून तो पुढील काही सामने खेळण्याबाबत साशंकता असल्याची चर्चा आहे.

4 / 6

भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली. पण मॅच फिनिशर या भूमिकेसाठी संघात जागा मिळवलेल्या दिनेश कार्तिकला अद्याप दिलेल्या भूमिकेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध तो घाईघाईत बाद झाला. तर आफ्रिकेविरूद्धही त्याला केवळ ६ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याच्या स्पर्धेतील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास सुरूवात झाली होती.

5 / 6

तशातच आता दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत विकेटकिपर म्हणून आपल्या अनुभवाचा भारतीय संघाला पुरेपूर उपयोग करून दिला आहे. पण आता मात्र कार्तिकची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे.

6 / 6

भारतीय संघाची फिल्डिंग सुरू असताना शेवटच्या ५ षटकांचा खेळ शिल्लक होता. त्यावेळीच दिनेश कार्तिकच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. त्यामुळे त्याला खेळ अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याच्या जागी रिषभ पंतने विकेटकिपिंग केली. त्यामुळेच बांगलादेशविरूद्ध कार्तिक संघाबाहेर बसून त्या जागी पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारतदिनेश कार्तिकरिषभ पंत
Open in App