Join us  

धोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 9:11 PM

Open in App
1 / 7

धोनीने 2007 साली ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला, त्यानंतर 2011 साली विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन्स करंडक जिंकला. पण धोनीला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले ते सचिन तेंडुलकरमुळे. सचिननेच धोनीची कर्णधारपदासाठी शिफारस केली होती.

2 / 7

महेंद्रसिंग धोनीला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाहिले असेल, तेव्हा त्याचे केस लांब होते. पण त्याने हे लांब केस का ठेवले होते, हे तुम्हाला माहिती नसेल. कारण धोनी हा जॉन अब्राहमचा चांगला मित्र आहे. त्यामुळे धोनीने त्याच्यासारखी आपली हेअरस्टाइल ठेवली होती, असे म्हटले जाते.

3 / 7

दुलीप करंडक खेळत असताना धोनी एका सामन्याला उशिरा पोहोचला होता. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्याजागी दीपदास गुप्ताला खेळवण्यात आले होते.

4 / 7

दुलीप करंडकाचा पहिला सामना धोनीला खेळता आला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी तो पुण्याला गेला. तिथे पहिल्यांदा त्याची भेट मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी झाली होती.

5 / 7

धोनीला भारतीय सैन्य दलाने लेफ्टनंट कर्नलपद दिले. हे पद मिळवणारा तो फक्त दुसराच क्रिकेटपटू आहे. यापूर्वी भारताचे माजी विश्वविजेते कर्मधार कपिल देव यांचा सैन्यदलाने सन्मान केला होता.

6 / 7

धोनीला क्रिकेटपेक्षा बॅडमिंटन आणि फुटबॉल हे दोन खेळ जास्त प्रिय होते. धोनीने क्रिकेटवर दहावीत शिकत असताना लक्ष दिले.

7 / 7

धोनीला आता सारेच यशस्वी कर्णधार म्हणून ओळखतात. पण धोनी त्यापूर्वी तिकीट चेकरचे काम करायचा. 2001 ते 2003 या वर्षांमध्ये धोनीने हे काम केले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी