Join us  

ICC T20 World Cup 2022: "आयसीसीलाच भारताला उपांत्य फेरीत घेऊन जायचे आहे", शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 2:29 PM

Open in App
1 / 7

भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात 6 गुण मिळवून उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. सध्याच्या घडीला भारत ब गटात अव्वल स्थानावर आहे. आता भारताचा अखेरचा सामना रविवारी झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. त्या सामन्यात देखील भारत विजय मिळवेल आणि उपांत्य फेरी गाठेल अशी अपेक्षा आहे. भारताने या विश्वचषकातील 4 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

2 / 7

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करून तिसरा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीकडे कूच केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 गडी गमावत 184 धावा केल्या होत्या. पावसाचा व्यत्यय आल्याने बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 6 गडी गमावून केवळ 145 धावाच करू शकला.

3 / 7

खरं तर भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. भारतीय संघाने 20 षटकांत 184 धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाने शानदार फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. सलामीवीर लिटन दासने 21 चेंडूत अर्धशतकी खेळी करून भारताच्या अडचणीत वाढ केली.

4 / 7

अशा परिस्थितीत अचानक पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला. पावसाच्या विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला असता भारताने जोरदार कमबॅक केला. लोकेश राहुलने आक्रमक वाटणाऱ्या लिटन दासला धावबाद करून बांगलादेशच्या आशेवर पाणी टाकले. त्यानंतर देखील बांगलादेशच्या फलंदाजांना मोठे फटकार मारणे सुरूच ठेवले. मात्र अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीच्या जोडीने त्यांना फार काळ खेळपट्टीवर टिकून दिले नाही.

5 / 7

बांगलादेशने सात षटकांत 66/0 अशी मजल मारल्यानंतर पावसाने खेळात व्यत्यय आणला. त्यानंतर बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. अशा परिस्थितीत पाकिस्तानी चाहत्यांचा असा विश्वास आहे की पावसामुळे खेळपट्टी ओली असूनही आयसीसीने मुद्दामच सामना सुरू केला कारण सामना पुन्हा सुरू झाला नाही तर भारत हा सामना गमावेल.

6 / 7

अशातच पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचा दाखला देत आयसीसीवर टीका केली आहे. आयसीसीवर भारताला नकळत पाठिंबा दिल्याचा आरोप आफ्रिदीने आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्ही शोमध्ये बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, 'तुम्ही पाहिले असेल की मैदान किती ओले होते. पण आयसीसीचा कल भारताकडे आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारताला उपांत्य फेरीत पोहचवायचे आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान अंपायर देखील तोच होता, ज्यानंतर त्या अम्पायरला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळेल असे दिसते आहे.'

7 / 7

भारत आणि बांगलादेशचा सामना पाऊस असताना देखील खेळवला गेला असा आरोप आफ्रिदीने केला आहे. पाऊस खूप झाला होता. मात्र काहीश्या विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला. हे अगदी स्पष्ट आहे की याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता, भारत जो सामना खेळत होता, त्यात येणारा दबाव, अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत. पण लिटन दासची फलंदाजी अप्रतिम होती. तो सकारात्मक क्रिकेट खेळला. सहा षटकांनंतर आम्हाला वाटले की बांगलादेशने आणखी 2-3 षटकात बळी गमावले नसते तर सामना जिंकला असता. एकूणच बांगलादेशने दाखवलेली झुंज अप्रतिम होती. असे आफ्रिदीने अधिक म्हटले.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध बांगलादेशशाहिद अफ्रिदीभारतीय क्रिकेट संघआयसीसी
Open in App